सोलापूर शहरात 6 कोविड बाधीत रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 2 रुग्ण औषधोपचाराने बरे झाले आहेत.उर्वरित 4 रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे . या आजाराचा मुकाबला करण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असून नागरिकांनी घाबरुन न जाता सतर्क रहावे, असे आवाहन महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांनी केले आहे. सध्या महाराष्ट्रासह देशाच्या काही राज्यातील कोविड -19 रुग्णांच्या दैनंदिन संख्येत वाढ होत आहे. त्यापार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आज अखेर 6 कोविड बाधीत रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 2 रुग्ण औषधोपचाराने बरे झाले असून उर्वरित 4 रुग्णांवर शहरातील खाजगी रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.नववर्ष स्वागत आणि जानेवारी महिन्यात भरणाऱ्या गड्डा यात्रेच्या निमित्ताने नागरिकांनी अनावश्यक गर्दी करण्याचे तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.
तसेच सर्दी खोकला असणारे, आजारी व्यक्ती, ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त यांनी प्राधान्याने मास्कचा वापर करावा.यासह वांरवांर हाताची स्वच्छता राखावी.जे फल्यू सदृश्य लक्षणे असणारे रुग्ण आहेत त्यांनी व श्वसनास त्रास होणाऱ्या रुग्णांनी जवळच्या आरोग्य केंद्रात जावून आपली कोविड चाचणी करुन घ्यावी. तसेच चाचणीचा अहवाल येईपर्यंत स्वत:हून अलगीकरणात रहावे. याबरोबरच कोविड पॉझीटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीनी आपली कोविड चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन सोलापूर महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.