गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरच सोन्याच्या दराची उच्चांकी नोंद झाली. ६४ हजार रुपये १० ग्रॅम (२४ कॅरेट, ३ टक्के जीएसटी वगळून) असा त्याचा दर होता. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुपुष्यामृत योगावर सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. त्याच दिवशी दर वाढले. तरीदेखील सराफ बाजारात समाधानकारक खरेदी झाल्याचे व्यापारी म्हणाले. ११ नोव्हेंबरला ६० हजार ५०० रुपये दर होता. त्यानंतर या दरात सातत्याने वाढ सुरूच आहे. जानेवारीपासून लग्नमुहूर्त आहेत. पुढे दर आणखीन वाढतील म्हणून गुरुपुष्यामृत योगावरच सोने खरेदी करण्याचे ज्यांनी ठरवले, त्यांचा मात्र हिरमोड झाला. सराफ बाजारात सायंकाळी ग्राहकांची रेलचेल होती. मंगळसूत्र खरेदीसाठी ग्रामीण ग्राहक मोठ्या संख्येने आले. चांदीच्या वस्तूंनाही मागणी होती, असे सराफ व्यापाऱ्यानी सांगितले एकंदर दरवाढीचा आलेखमध्ये १७ डिसेंबर रोजी : ६१.६०० ते २९ डिसेंबर रोजी तोच दर ६४. हजारांच्या घरात गेला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...