सोलापूर – पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या भरोसा सेल येथे पती-पत्नी प्रकरणामध्ये ०१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०२५ या वर्षात समुपदेशन करुन एकुण ६३७ संसार जोडण्यात आले. त्या प्रमाणे एकुण ६३७ जोडप्यांचे समुपदेशन करण्यात येवुन त्यांचा संसार सुखाने व आनंदाने चालल्याचे दिसुन आले त्या प्रमाणे सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात ३० जोडप्यांना सुमपदेशन कार्यालयात बोलावुन त्यांचा सुखी संसारासाठी वरिष्ठांचे हस्ते रोपटे देवुन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत “नांदा सौख्य भरे” हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याकरीता पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली, पोलीस उपआयुक्त मुख्यालय, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ, पोलीसउप-आयुक्त (गुन्हे/विशा), सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, म. सु.वि. कक्ष, सहा. पोलीस निरीक्षक तसेच महिला कक्षाकडील सर्व पोलीस अंमलदार यांनी आज दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी महिला सुरक्षा विशेष कक्ष येथील कार्यालयात कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.
सोलापूर शहर आयुक्तालयामध्ये भरोसा सेल कार्यरत असुन कार्यक्षेत्रातील एकुण ०७ पोलीस स्टेशनचे हद्दीमधुन महिलांच्या कौटूंबिक, शारिरीक व मानसीक छळाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी अर्ज दाखल होत असतात. त्यामध्ये सन ०१ जानेवारी २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ मध्ये भरोसा सेल सोलापूर शहरकडे एकुण १३८८ तक्रारी अर्ज भरोसा सेल येथे दाखल झाल्या होत्या. भरोसा सेल येथे कार्यरत असलेले एकुण २ अधिकारी व १८ कर्मचारी असे मिळुन येणारे पती पत्नी तक्रारदार महिला नागरीक यांच्या तक्रारीचे समुपदेशन करुन निवारण केले जाते. भरोसा सेल येथे सोलापूर शहर हद्दीतील तक्रारदार महिलांना त्यांचे योग्य ते समुपदेशन करुन त्यांच्यात समझोता घडवुन आणुन त्यांना त्यांचे पुढील आयुष्य आनंदाने जगता यावे यासाठी सर्वतोपरी मदत केली जाते. कौटूंबिक घरगुती कारणांवरुन प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जात पती-पत्नी यांना भरोसा सेल येथे बोलावुन एकमेकांसमोर बसवुन त्यांचेकडे भरोसा सेल येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी समुपदेशन करुन त्यांच्या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही केली जाते. तसेच पिडीत महिलेबाबत तिचेवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीविरुध्द कायदेशीर कारवाई करणेकामी संबधित पोलीस ठाणे येथे पाठविले जाते. तसेच ज्या प्रकरणात समुपदेशन करुनही समझोता घडुन येत नाही असे प्रकरणे कौटूंबिक न्यायालयाकडे पाठविली जातात.
सोमवारी पार पडलेल्या कार्यक्रमात अर्जदार व गैरअर्जदार यांना बोलावुन त्यांचा सुखाने चाललेल्या संसाराचा आढावा घेण्यात आला त्यावेळी समझोता झालेले जोडप्यानी महिला सुरक्षा कक्ष सोलापूर शहर भरोसा सेल येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी योग्य समुपदेशन केल्याने त्यांचा तुटणारा संसार पुन्हा जोडला असे मनोगत करुन पोलीस आयुक्त सोलापूर शहर व महिला सुरक्षा विशेष कक्ष भरोसा सेलचे आभार मानून समाधान व्यक्त केले.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, म.सु.वि. कक्ष स्नेहा म्हेतर, सहा. पोलीस निरीक्षक स्वाती येळे, ग्रेडपोसई महेश महामुनि, सफौ अंजली राठोड, लता राउत, ताजुद्दीन शेख, पोहवा निलम माळवे, सैफन पटेल, सुजाता यादवाड, कफिल पिरजादे, मपोशि कविता डांगे, अंबिका सुरवसे, इंदिरा राठोड, शितल माने, सरस्वती घाडगे, नसिमा शेख यांनी केली आहे.

















