मोहोळ – मोहोळ नगर परिषदेच्या अत्यंत चुरशीने अटीतटीने पार पडलेल्या निवडणुकीत ७१ .७२ टक्के मतदान झाले
मोहोळ नगर परिषदेची निवडणूक मंगळवारी दि. २डिसेंबर २०२५ रोजी पार पडली . या निवडणुकीत नगराध्यक्ष पद हे पहिल्यांदाच जनतेतून असल्याने या पदासाठी भाजपा शिवसेना (शिंदे)आणि शिवसेना (उबाठा) काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या प्रमुख पक्षांसह एकूण११ महिला रिंगणात उतरल्या होत्या. या नगराध्यक्ष पदाच्या एका जागेसाठी ११ महिला व १० प्रभागा मध्ये नगरसेवक पदाच्या २० जागांसाठी ९७ उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी प्रभाग क्र ३ मधील नागरिकाचा मागास प्रवर्ग या एका जागी व प्रभाग क्रमांक ५ येथील सर्वसाधारण पुरुष जागेसाठी असणारे एका जागेचे मतदान कोर्टाच्या आदेशाने पुढे ढकलण्यात आल्यामुळे एकूण १८ जागांसाठी मतदान झाले.

पुढे ढकलण्यात आलेल्या या दोन जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. काही किरकोळ प्रकार वगळता शांततेमध्ये पार पडले, मोहोळ नगर परिषदेसाठी सकाळी ७ वाजता मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीत सकाळी ११ पर्यंत ९.३२% टक्के मतदान झाले. एकूण मतदानापैकी २२७६ मतदारांनी मतदान केले.
दुपारी १.३० पर्यत २४४१३ मतदारा पैकी १०१०२ जणांनी केले.ही टक्केवारी ४१.३८ झाली. दुपारी ३.३० पर्यत एकूण २४४१३ मतदारापैकी १४०१० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या वेळेपर्यत ५७ .३९ % मतदान झाले होते . प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्नशील होता .

काही ठिकाणी पोलिस मतदान प्रतिनिधी यांच्यामध्ये किरकोळ बाचाबाची होत असल्याचे चित्र पहायला मिळाले .एकंदरीत मतदारांमध्ये चांगला उत्साह असल्याचे दिसून आले .बुधवारी मतमोजणी होणार होती पण ती पुढे ढकलण्यात आल्यामुळे मात्र सर्वांच्या तोंडातून निराशेचा सूर निघाला . पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
(१)भाजपाच्या उमेदवार सौ. शीतल क्षीरसागर आणि त्यांचे पती सुशील भैया यांनी मतदान केले.
(२)काँग्रेसच्या उमेदवार एडवोकेट सोनल जानराव डावीकडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मतदान केले.
(३)शिवसेना उबाठाच्या उमेदवार सौ उज्वला कांबळे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी दत्तनगर येथे मतदान केले.
























