*संजय गांधी निराधार योजनाचे चे ८१५ फाइली मंजूर*
——-
देगलूर : संजय गांधी निराधार योजनाच्या अध्यक्ष पदी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष पाटील यांची नियुक्ति नंतर देगलूर तहसील मध्ये संबधित विभागाच्या कामात मोठी गती व पारदर्शकता आली असून संतोष पाटील यांनी या योजनाची लाभ सर्वसामान्य लाभार्थ्यांना मिळावा यासाठी अविरत कष्ट घेत देगलूर तहसीलच्या प्रत्येक गावात सदरील योजनाचे लाभ घेण्याचे आवाहन केले.
दरम्याण देगलूर तहसीलमध्ये एकुन ९०२ फाइली तहसील कार्यालयाच्या संगांनी व श्रावण बाळ योजना विभागाला प्राप्त झाले होते.यामधून ८१५ फाइली मंजूर करण्यात आली. यात संजय गांधी निराधार योजना चे १५८ आणी श्रावण बाळ योजना चे एकुन ६५७ फाइली मंजूर करण्यात आले.
सण १९८० साली संजय गांधी निराधार योजना ची स्थापना करण्यात आली होती.
जवळपास गेल्या ४४ वर्षानंतर इतक्या मोठ्या संख्याने या योजनाचे लाभ लोकांना मिळाला आहे.
सदरील माहिती संजय गांधी निराधार योजना चे अध्यक्ष संतोष पाटील आणी सचिव तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी दिले असून
सदरील दोन्ही योजनांचे लाभ लाभार्थ्यांना मिळालाच पाहीजे यासाठी धडपडणारे अण विनाविलंब सर्वसामान्यांना सहकार्य करणारे अध्यक्ष म्हणून संतोष पाटील यांची देगलूरात कौतूक होत आहे.विशेष म्हणजे संतोष पाटलांनी या लक्षणीय संख्येच्या लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यासाठी समितीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले असल्याचे प्रतिक्रीया दिले