कौटुंबिक व्यापातून महिलांना व्यक्त होण्याची संधी मिळत नाही. मात्र, सणवाराच्या निमित्ताने त्यांना एकत्र येऊन व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळत असल्याचे प्रतिपादन अंजली अवताडे यांनी व्यक्त केले.नागपंचमी सणाच्या निमित्ताने जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांच्या पुढाकारातून हिवरगाव येथे महिलांसाठी एक दिवशीय विविध कार्यक्रम व यात्रेचे आयोजन करण्यात आले.
त्या कार्यक्रमात बक्षीस वितरण प्रसंगी त्या बोलत होत्या.व्यासपीठावर सुमन खांडेकर, माधुरी खांडेकर,कमल खांडेकर, अनिता वाघमारे ,अंबिका कर्वे,वैशाली वाघमोडे,अनुसया नागणे,रेखा खांडेकर,लक्ष्मी खांडेकर, उज्वला चवरे,यांच्यासह या परिसरातील 500 हून अधिक महिलांची उपस्थिती होती.