पूर्वोत्तर भारतातील मिझोराम येथे आज, बुधवारी निर्माणाधिन रेल्वे पूल कोसळून झालेल्या अपघातात 17 कामगारांचा मृत्यू झालाय. मिझोरामची राजधानी आयझवालपासून 21 किलोमीटर अंतरावरील सैरांगमध्ये सकाळी 10 वाजेच्या सुमाराला हा अपघात घडला.
यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार सैरांगमध्ये नेहमीप्रमाणे आजही पुलाचे बांधकाम सुरू होते. यावेळी त्याठिकाणी 35 ते 40 कामगार कार्यरत होते. बैराबी आणि सायरंग यांना जोडण्यासाठी कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता. जमिनीपासून पुलाची लांबी 104 मीटर (341 फूट) आहे. अर्थात हा पूल कुतूबमिनाहून उंच आहे. या पुलाचे एकूण 4 पिलर्स असून पूलाचे बांधकाम सुरू असताना तिसऱ्या आणि चौथ्या पिलरवरील गर्डर तुटून खाली पडला. यावेळी त्याठिकाणी 35 ते 40 कामगार काम करती होते. गर्डर कोसळून सुमारे 17 मजूर मृत्यूमुखी पडलेत. घटनेनंतर प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोराम थांगा यांनी अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. प्रशासन मदत कार्य करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसचे जखमींच्या दीर्घायुष्यासाठी त्यांनी प्रार्थना केली आहे.