स्मार्ट सिटी योजनेंतर्गत ५१ कोटींचा स्काडा (सुपरवायजरी कंट्रोल ॲड डेटा ॲक्विजिशन) प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला असून, उजनीपासून, जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी शुद्ध करण्यापासून नागरिकांच्या घरी पोहचवण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया व नियंत्रण संगणकीय प्रणालीद्वारे यामध्ये होणार आहे.उजनीपासून ते नागरिकांच्या घरापर्यंत पाणी वितरित होणाऱ्या प्रक्रियेत पाणी चोरी, गळती आदींची दैनंदिन माहिती उपलब्ध होण्याबरोबर या प्रकल्पामुळे शहराला समतोल पाणीपुरवठा होणार आहे. महापालिका प्रशासनाने पाणी, रस्ते, शिक्षण व आरोग्य या गोष्टी सुधारण्याला प्राधान्य दिले आहे. सुरळीत पाणीपुरवठा हा शहराचा कळीचा मुद्दा आहे. विविध कारणास्तव शहरवासीयांना बाराही महिने विस्कळित पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...