जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये नळाचं पाणी भरत असताना विजेचा धक्का लागून एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागला आहे. ही दुर्दैवी घटना जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरामध्ये घडली आहे. नम्रता संदीप सुरडकर असे मृत पावलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. नम्रताच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळी नळाला पाणी आल्याने नम्रताने पाणी भरण्यासाठी विद्युत मोटर सुरू केली. नम्रता नळावरून पाणी भरत होती. याचदरम्यान तिचा तिथे पडलेल्या ओपन असलेल्या इलेक्ट्रिक वायरला तिचा स्पर्श झाला आणि तिला विजेचा मोठा धक्का बसला. यानंतर तिला तातडीनं शहरातील एक खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी तिला मृत घोषित करण्यात आले.
नम्रताच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. नम्रता दहावीच्या वर्गात शिकत होती. आपली तरुण पोर गमावल्याने नम्रताच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.