भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील कनेरी येथे घराजवळ खेळत असलेल्या दोन बालकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने जखमी केल्याची घटना घडली असून यात रक्षित योगराज बन्सोड (8)आणि निलकमल संदीप बन्सोड (6) हे जखमी झाले आहेत . प्राथमिक उपचारार्थ लाखनी हलविण्यात आले आहे. मात्र यातील निलकमलला जास्त दुखापत असल्याने त्याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे कनेरी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून त्या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...