मध्य रेल्वे भुसावळ विभागातंर्गत सहा मेल, एक्स्प्रेस गाड्यांची ३० किमी प्रतितास वेगाची चाचणी बुधवारी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शन दरम्यान ५२६.७६ किमी स्पीड ट्रायल घेण्यात आली असून, याद्वारे वेळेची बचत करण्याचा प्रयोग रेल्वे विभागाचा आहे.
इगतपुरी-भुसावळ-बडनेरा सेक्शनमध्ये २६ ते ३० ऑगस्ट दरम्यान ५२६.७६ किमीचे अंतर ६ ट्रेनसह अप आणि डाउन दिशानिर्देशांमध्ये १३० किमी प्रतिताससह स्पीड ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. यात डाउन दिशेने सरासरी वेळेची 28 मिनिटे बचत झाली आहे आणि अप दिशेत सरासरी वेळेची बचत ३० मिनिटे झाल्याची नोंद भुसावळ विभागाने घेतली आहे. भुसावळ विभागातील ५२६.७६ किमी लांबीच्या इगतपुरी-भुसावळ-बडनेरा विभागात एकूण ६७ ट्रेन १३० मी प्रति तास धावण्याचे नियोजन आहे. सहा मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या १३० किमी प्रतितास वेगाच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे १३० किमी प्रतितास वेगाने धावणाऱ्या ट्रेनच्या नियमित धावण्याची पुढील प्रक्रिया निरंतरपणे सुरू असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी डी.जी. पाटील यांनी दिली.
या सहा गाड्याची यशस्वी चाचणी
– १२२८९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -नागपूर दुरांतो एक्सप्रेस
– १२२९० नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
– १२१०५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोंदिया विदर्भ एक्सप्रेस
-१२१०६ गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्सप्रेस
– १२८५९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हावडा गीतांजली एक्सप्रेस
– १२८६० हावडा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गीतांजली एक्सप्रेस