सध्या राज्यामध्ये तसे देशांमध्ये इलेक्ट्रिक बाइकला प्राधान्य दिले जात आहे. पेट्रोलच्या गाड्यांना तोड देण्यासाठी शहरात इलेक्ट्रिक बाइक दाखल झाले आहेत. मात्र या इलेक्ट्रिक बाइक आता घातक ठरत आहेत. सोलापूर शहरात एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा चालत्या इलेक्ट्रिक स्कूटीला आग लागण्याची घटना घडली आहे. आठवड्यात अगोदरच रामलाल चौक याठिकाणी आगीची घटना घडली होती. त्या आगीत ईलेट्रीक वाहनचालकांचे सव्वा लाखाचे नुकसान झाले होते. दरम्यान अशीच घटना आता पुन्हा एकदा घडली आहे. नीलम नगर रोडवर चालत्या इलेक्ट्रिक स्कुटीला अचानक आग लागल्याने इलेक्ट्रिक स्कूटी जळून खाक झाल्याचे दिसून आले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.