बालाजी अमाईन्सकडून सीएसआर अंतर्गत सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील ४० शाळांना संगणक, प्रोजेक्टर, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट बोर्ड, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य व बेंचेस इत्यादी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे अध्यक्षस्थानी होते, प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे आणि केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी अंकुश चव्हाण उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी बालाजी अमाईन्सचे कौतुक केले आणि ज्या गोष्टी प्रशासनास साध्य करण्यास वेळ लागतो. त्या गोष्टी कंपनीने सीएसआरच्या माध्यमातून खूप कमी वेळात पूर्ण केले असून समाजातील त्यांचे काम उल्लेखनीय असल्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली. मनीषा आव्हाळे आणि अंकुश चव्हाण यांनीदेखील कंपनीने करत असलेल्या कामाचे कौतुक करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि सर्व शाळांना मिळालेल्या वस्तूंचा व्यवस्थित वापर करण्याचे आवाहन केले.