शहरात चंदन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरट्यांनी कर्वेनगर भागातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत आशिष पवार यांनी वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पवार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत सुरक्षा अधिकारी आहेत. मध्यरात्री चोरटे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या आवारात शिरले. चोरट्यांनी करवतीचा वापर करुन चंदनाचे झाड कापून नेले. चंदनाचे झाड कापून नेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक जवळगी तपास करत आहेत.