पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती पार्किंगमधील जागेत फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसायास जागा देण्यावर ठाम आहे. यास माजी नगरसेवक, व्यापारी तसेच परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला आहे.आमदार माधुरी मिसाळ यांनीही विरोध केला आहे, चर्चेनंतरही बाजार समिती आपला निर्णय बदलण्यास तयार नाही, त्यामुळे बाजार समितीची नवनिर्वाचित हेकेखोर समितीच बरखास्त करण्याची व्यापाऱ्यांनी केलेली मागणी मंत्रालयात आमदार मिसाळ यांच्याद्वारे मांडण्यात येणार आहे. त्यामुळे हा मुद्दा मंत्रालयात गाजण्याची शक्यता आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीची शिवनेरी पथावरील भाजी मार्केट सामोरील पार्कींग मधील जागा होलसेल फिश मार्केट व पोल्ट्री व्यवसायास देण्यासाठी बाजार समिती कमिटीमध्ये ठराव मंजूर केल्याबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सदर ठरावास नागरिकांकडून कडाडून विरोध होत आहे. स्थानिक पातळीवर येत्या काही दिवसांत नागरिकांनी बाजार समितीच्या या निर्णया विरोधात आंदोलने करण्याची तयारी सुरुवात केली आहे.