लातूर -31 डिसेंबरच्या पुर्वसंधेला लातूरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध दारू साठ्यावर धाडी टाकल्या असून यात तब्बल 21 लाखांचा मुद्ेमाल जप्त केला असून यातील दोन आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी अवैध धंद्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देशित दिलेे आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलावंडे यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी अंमलदारांचे वेगवेगळी पथके तयार करून जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करण्याची मोहीम राबवित आहेत.
त्या प्रमाणे लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कार्यवाही करण्याकरिता अवैध धंद्याची माहिती काढत असताना पोलीस पथकास मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून विराट नगर, खाडगाव रोड परिसरात प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची चोरटी विक्री व्यवसाय होत आहे. अशी बातमी मिळाल्याने या माहितीची शहनिशा करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या ठिकाणी छापा मारून एका व्यक्तीस ताब्यात घेऊन त्यांचे कडून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेले वेगवेगळ्या कंपनीचे,महाराष्ट्र राज्यामध्ये विक्रीसाठी प्रतिबंधित असलेले गुटका, सुगंधित पानमसाला, त्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणार्या बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 18 लाख 33 हजार 550 रुपयांचा प्रतिबंधित गुटका व सुगंधित पान मसाला तंबाखू जप्त करण्यात आले आहे. पोलीस अमलदार अंगद कोतवाड यांचे तक्रारीवरून पोलीस ठाणे एमआयडीसी येथे प्रतिबंधित गुटका, सुगंधित तंबाखूची अवैद्य साठवणूक करून विक्री व्यवसाय करणारा फिरोज उर्फ आदम आयुब उमाटे राहणार विराट नगर, खाडगाव रोड, यााचे विरुद्ध पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा दाखल करून 18 लाख 33 हजार 550 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, पान मसाल्याचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.
उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून चोरटी विक्री व्यवसाय करणारा राहुल लक्ष्मण कांबळे लोहारा याला देशी दारूची अवैध वाहतूक करण्यात येत असलेल्या कारसह ताब्यात घेऊन त्यामधील 53 हजार रुपये किमतीचे 16 बॉक्स देशी दारू कारसह जप्त केले. उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांचे नेतृत्वातील पथकामधील पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, सचिन मुंडे, बालाजी जाधव, रवी कानगुले यांनी पार पाडली.