पुणे येथील फुलेवाडा येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले व फुले वाड्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्रातल्या ओबीसी लढ्याचा जनक मीच आहे. छगन भुजबळ यांनाही मीच जेलबाहेर काढलं. मी जर न्यायमुर्तींना प्रश्न विचारले नसते तर ते जेलबाहेर आले नसते, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. यावेळी छगन भुजबळ यांच्या ओबीसी लढ्याविषयीच्या भूमिकेवर प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली.
पुणे येथील फुलेवाडा येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर हे महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले व फुले वाड्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
भुजबळांना जेलबाहेर काढले पण त्यांनी आभार मानले नाहीत
महाराष्ट्राच्या ओबीसी लढ्याचा जनक मीच आहे. इतिहास जरा वाचून घ्या. छगन भुजबळ जेलमध्ये असताना मी जर न्यायमुर्तींना प्रश्न विचारले नसते तर भुजबळ जेलबाहेर आले नसते. पण त्यांनी याबद्दल माझे कधीही आभार मानले नाहीत, अशी खंतही प्रकाश आंबेडकर व्यक्त केली. त्याचवेळी मुंबईच्या शिवाजी पार्कवरील सभेत मी माझी ओबीसी-मराठा आरक्षणावरील भूमिका मांडली आहे. नव्याने भूमिका मांडणार नाही, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.
देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केलं जातंय
राज्यात अनेक ठिकाणी ३ डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता आहे. सगळ्या पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. त्याचवेळी देशात मुस्लिमांना आणि ओबीसींना टार्गेट केलं जातंय, असंही आंबेडकर म्हणाले.
पॅलेस्टाईन-इस्राईल मुद्द्यावर ‘वंचित’ची मुंबईत शांती सभा
प्रकाश आंबेडकर यांनी पॅलेस्टाईन – इस्राईल मुद्द्यावर मुंबईत वेगवेगळ्या मुस्लीम संघटनांनी आणि धर्मगुरूंनी एकत्र येत शांती सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. इस्राईल – पॅलेस्टाईन युद्धाची व्याप्ती वाढली तर याचा भारतावर परिणाम होईल, आखाती देशात ५ कोटींच्यावर भारतीय लोक राहतात त्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकारला ओझं उचलावचं लागेल अशी शक्यताही त्यांनी यावेळी वर्तवली. आंतरराष्ट्रीय मुद्द्याकडे धर्माच्या चष्यम्यातून न पाहता सर्वधर्मियांनी या सभेला उपस्थित राहण्याचे आवाहनही ॲड. आंबेडकरांनी केले आहे.
भुजबळांचा जरांगे पाटलांना इशारा
आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार प्रत्येक समाजाला आहे. परंतु, गावबंदीसारखे मार्ग अवलंबून कोणी हक्कांवर गदा आणू पहात असेल, तर त्याविरोधात आम्ही आवाज उठविल्याशिवाय राहणार नाही.आमच्या हक्कांवर गदा, गंडांतर आणले जाणार असेल, तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी दिला.