जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट नियमबाह्य लावल्या प्रकरणी महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना गेल्या तीन दिवसांपासून पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई होत नाही तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी लक्ष देत नसल्याचा आरोप करत आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने भोगाव येथील मोठ्या पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आले. बायोक्लीन जैविक कचरा प्रकल्प या ठेकेदाराने कोविडच्या काळामध्ये पीपी किट आणि औषधे यावर प्रकिया करून नष्ट न करता ते जमिनीत पुरल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे. बायोक्लीन कंपनीच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे शोले स्टाईल आंदोलन रात्री उशिरापर्यंत सुरु होते. महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त आणि आरोग्य अधिकारी यांना गेल्या तीन दिवसांपासून पत्रव्यवहार करून सुद्धा कारवाई होत नाही तसेच महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अधिकारी मोरे हे या प्रकरणाकडे लक्ष देत नसल्याचा आरोप करत आज प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख अजित कुलकर्णी, जमीर शेख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...