सोलापूर शहरात शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना पिसाळलेली मोकाट कुत्री, भटक भवानी, सोलापूरचा कलंक अशी उपमा देत कुत्रीच्या गळ्यात वाघमारे यांचा फोटो लावून शेण व काळे फासून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. गेलीतीन-चार महिन्या पासून शिंदे गटाच्या प्रवक्ता ज्योती वाघमारे हे आपल्या बेताल वक्तव्यातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे ,शिवसेना नेते संजय राऊत , उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरून टीका टीपणी करीत आहेत. त्याचा सोलापूर शिवसेना महिला आघाडीने खरपूस समाचार घेतला.ज्योती वाघमारे ह्या घरमोडे आहेत, त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडणारी विधाने करून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न चालविला आहे, ही घरमोडे बाई सोलापूरला लागलेला एक कलंक आहे घरमोडे बाई मुर्दाबाद अशा घोषणा महिलांनी यावेळी दिल्या.शिवाय त्यांच्या पोस्टरला शेण लावून, काळे फसले.. तसेच या बेताल बाईचा तात्काळ बंदोबस्त पोलिसांनी करावा अन्यथा गाठ आमच्याशी आहे, असा इशारा शिवसेना ठाकरे पक्षाच्या सोलापूर महिला आघाडीने दिली आहे. यावेळी महिला संघटिका प्रीती नायर, युवती सेना अधिकारी पुजा खंदारे,छाया वायदंडे ,मंगल थोरात ,शशिकला चिवडशेट्टी ,सुनीता लोंढे ,स्वाती रुपनर, मीना सुरवसे, प्रभावती येलगुंडे ,जोहरा रंगरेज ,आदीसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...