लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या औसा तालुका मुख्य शाखेत नागरसोगा येथील खातेदार राधाबाई व्हांतले या पैसे काढण्यासाठी आलेल्या होत्या. मात्र त्यांची बॅग, महत्वाची कागदपत्रे रोख रक्कम 1 हजार रुपये असलेली बँग बँकेच्या शाखेत विसरल्या. ही बाब शिपाई बबन भाले यांच्या लक्षात आली. त्यांनी ही बॅग व्यवस्थापक सुशांत कुलकर्णी यांच्याकडे जमा केली. कागदपत्र, आधार कार्ड बघून त्यांना मोबाईलवर संपर्क करून त्या ग्राहकास बोलावून रोख रक्कम कागदपत्रं असलेली बॅग कर्मचारी भाले यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी बँकेचे व्यवस्थापक सुशांत कुलकर्णी, शिपाई बबन भाले यांचे राधाबाई व्हांताले यांनी कागदपत्रं रोख रक्कम मिळवून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे.
बँकेचे व कर्मचार्यांचे सोशल मीडिया माध्यमांतून कौतुकाचा वर्षाव
दोन दिवसांपूर्वी निलंगा शाखेत ग्राहकांनी 50 हजार रुपये जास्तीचे पैसे भरलेले होते. ते बँकेतून ग्राहकास परत देण्यात आले. आज औसा शाखेतील जिल्हा बँकेच्या कर्मचार्यांनी ग्राहकांची हरवलेली बँग, रोख रक्कम तात्काळ त्यांना बँकेत बोलवून दिल्याबद्दल नागरसोगा येथील ग्रामस्थांनी बँकेचे कौतुक करून आभार व्यक्त केले आहेत. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या औसा शाखेत नागरसोगा येथील राधाबाई व्हंताळे यांची बॅग रोख रक्कम सापडल्याने त्यांना बोलवून बँकेचे कर्मचारी भाले यांच्या हस्ते देण्यात आले. बँकेच्या कर्मचार्यांनी कागदपत्र रोख रक्कम सापडलेली बॅग फोन करून ग्राहकास दिल्याबद्दल बँकेचे आभार व्यक्त केले आहे. तसेच बँकेच्या अधिकारि कर्मचारी यांचे बँकेचे खातेदार यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.