मीटर रिडींगचे फोटो काढण्याचा कंटाळा करुन खोटे फोटो लावत लोकांना वीज चुकीचे बिल दिले जात आहेत. यावर मागीलवर्षी १४ लाख ३४ हजार लोकांना चुकीचे बिल देण्यात आले होते तर यावर्षी सात लाख लोकांनी चुकीचे बिल देण्यात आले अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली.
‘मीटर रिडर फोटो काढण्याचा कंटाळा करून खोटे फोटो लावून लोकांना चुकीचे बिल दिले जात असल्याचेही पुढे आले. या प्रकारांवर आळा बसावा यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. गेल्यावर्षी १४ लाख ३४ हजार चुकीचे बिल देण्यात आले होते. ही संख्या आता ७ लाखांवर आली आहे’, अशी कबुली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पालघर जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबाला अवास्तव वीज देयके आकारल्याचा मुद्दा आमदार विनोद डहाणू यांनी प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. ‘मीटरचे रिडिंग न काढता बिल देण्यात आले होते. अशी शक्यता आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून त्यांना बिलात सवलती देण्यात आल्या आहेत. इतर तक्रारींचेही निराकरण करण्यात येईल. चुकीचे बिल देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल’, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ०.३ टक्के चुकीचे बिल देण्यात आले आहे.
स्वत: वीज मीटर रिडिंग घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. स्मार्ट मिटर लावण्यात येत आहे. यामुळे ही समस्या सुटेल. गावात वीज घेतात, मात्र पीडी झाल्यामुळे त्यांना वीज कनेक्शन दिले जात नाही. त्यांना पुन्हा वीज जोडणी करणारी योजना आणू, असे फडणवीस म्हणाले.
वीज बिल कळतच नाही
वीज बिल समजणे कठीण आहे. त्यामुळे वीज बिल सोप्या पद्धतीने देण्यात यावे, अशी मागणी आमदार आशिष जयस्वाल यांनी केली. अभय योजना आणण्यात येईल. बिलाचा फॉरमॅट अधिक सोईचा करण्याचाही प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सत्ताधारी अजित पवार गटातील समावेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला आहे त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशन राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळतेय