इंडियन प्रीमियर लीग २०२४ साठी लिलाव आज म्हणजेच १९ डिसेंबर रोजी दुबईतील कोका कोला एरिना येथे होणार आहे. आता या लिलावातून तीन खेळाडूंनी आपली नावे मागे
IPL म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा मिनी लिलाव आता लवकरच होणार आहे. या लिलावात ३३३ खेळाडू सहभागी होत आहेत. मिचेल स्टार्क, ट्रॅव्हिस हेड, रचिन रवींद्र यांसारख्या खेळाडूंना या लिलावात मोठी बोली लागू शकते. फ्रँचायझी या खेळाडूंवर खूप पैसा खर्च करू शकतात. मात्र, लिलावापूर्वीच तीन खेळाडूंनी आपली नावे मागे घेतली आहेत. नेमके हे कोण खेळाडू आहेत; जाणून घेऊया. आयपीएल २०२४ लिलावाच्या आधी आपली नावे मागे घेणारे हे खेळाडू विदेशी खेळाडू आहेत. यामध्ये शानदार गोलंदाजाचा समावेशही आहे.
शोरीफुल इस्लाम
बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज शरीफुल इस्लामने लिलावापूर्वी आपले नाव मागे घेतले आहे. शरीफुल बांगलादेशकडून तिन्ही फॉरमॅट खेळला आहे. त्याने बांगलादेशकडून ९ कसोटी, ३१ एकदिवसीय आणि ३१ टी-२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कसोटीत २०, एकदिवसीय सामन्यात ४७ आणि टी-२० मध्ये ३४ विकेट आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये, शरीफुल इस्लाम ८.४५ च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी करतो.
रेहान अहमद
इंग्लंडचा केवळ १९ वर्षीय युवा लेगस्पिनर रेहान अहमदनेही आयपीएल २०२४ च्या मिनी लिलावासाठी आपले नाव नोंदवले होते. तो लिलावाचा भाग असणार होता. मात्र त्याआधीच त्याने आपले नाव मागे घेतले. रेहान इंग्लंडकडून तिन्ही फॉरमॅटही खेळला आहे. त्याने १ कसोटी, ६ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे. अहमदच्या नावावर कसोटीत ७, एकदिवसीय सामन्यात १० आणि टी-२० मध्ये ७ विकेट आहेत.
तस्किन अहमद
बांगलादेशचा अनुभवी आणि तुफानी वेगवान गोलंदाज तस्किन अहमद देखील आयपीएल २०२४ च्या लिलावाचा भाग असणार होता. मात्र त्यानेही आपले नाव मागे घेतले आहे. तस्किनने बांगलादेशकडून १३ कसोटी, ७० एकदिवसीय आणि ५४ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत ३०, वनडेत ९५ आणि टी-२०मध्ये ५२ विकेट्स घेतल्या आहेत.