Monday, June 30, 2025
dainiktarunbharat.com
Advertisement
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबई-पुणे, नाशकातच नाही तर सोलापूरचं एमडी ड्रग्ज संपूर्ण देशात पोहोचतंय, तपासात धक्कादायक माहिती समोर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 19, 2023
in crime
0
मुंबई-पुणे, नाशकातच नाही तर सोलापूरचं एमडी ड्रग्ज संपूर्ण देशात पोहोचतंय, तपासात धक्कादायक माहिती समोर
0
SHARES
101
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

तस्करांनी सोलापुरात सुरू केलेल्या नशेच्या कारखान्यातून फक्त नाशिक, मुंबई, पुणे या जिल्ह्यांतच नव्हे, तर देशभरात एमडी पोहोचत असल्याची धक्कादायक माहिती

 

 

सामनगाव येथील एमडी ड्रग्ज प्रकरणातील तस्करांनी सोलापुरात सुरू केलेल्या नशेच्या कारखान्यातून फक्त नाशिक, मुंबई, पुणे या जिल्ह्यांतच नव्हे, तर देशभरात एमडी पोहोचत असल्याची धक्कादायक माहिती ‘मोक्का’अंतर्गत तपासात उघड झाली आहे. उमेश वाघ या संशयिताने पोलिसांना यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार, संशयित सनी पगारे आणि अर्जुन पिवाल गँगसह इतरांना एमडी कारखाने सुरू करण्यास मदत करणाऱ्या संशयित फय्याज (पूर्ण नाव नाही) याचा माग पोलिस काढत आहेत. सामनगाव एमडी प्रकरणातील पंधरा संशयितांवर तत्कालीन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘मोक्का’ लावला आहे. या प्रकरणातील संशयित सनी पगारे गँगने नाशिकमध्ये एमडी तस्करी सुरू केली. अर्जुन पिवालसह इतर साथीदारांमार्फत ही तस्करी राज्यभरात सुरू होती. त्यानंतर केरळच्या संशयितामार्फत रसायन खरेदी करून सनी याने सोलापुरात ‘एमडी’चा कारखाना सुरू केला. एकाच वेळी शंभर किलोंपेक्षा अधिक एमडी तयार करण्याची त्याची क्षमता होती.

 

 

मात्र, मोठ्या प्रमाणात एमडी बाजारात येण्यापूर्वी नाशिक अमली पदार्थविरोधी पथकाने सोलापुरात धाड टाकली. या प्रकरणातील संशयित उमेश सुरेश वाघ (रा. विरार) याने कारखाने सुरू करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार तस्करांनी हा ‘उद्योग’ केला. सनीच्या सोलापुरातील एमडी कारखान्यातील माल स्पीकर्समध्ये भरून तस्करी करण्याचा सल्लादेखील वाघ यानेच दिला होता. त्याने नाशिकसह राज्यातील इतर ठिकाणच्या एमडी कारखान्यांतही ‘सल्लागारा’ची भूमिका बजावल्याचा पोलिसांना संशय आहे. दरम्यान, या सर्वांचा मास्टरमाइंड आणि देशभरात एमडी विक्री करणारा मुख्य संशयित फय्याज असल्याची माहिती वाघच्या चौकशीत समोर आली आहे. नाशिकरोड विभागाचे सहायक पोलिस आयुक्त या प्रकरणी सखोल चौकशी करीत आहेत. त्यानुसार, फय्याजच्या मागावर काही पथके रवाना झाली आहेत.

 

 

ललितसह चौघे कारागृहात

शिंदे गाव एमडी प्रकरणातील संशयित ललित पानपाटील याच्यासह रोहित चौधरी, हरीश पंत, जिशान शेख या संशयितांना अमली पदार्थविरोधी पथकाने सोमवारी (दि. १८) जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची रवानगी पुन्हा मुंबईतील आर्थररोड कारागृहात करण्यात आली. दहा दिवसांच्या पोलिस कोठडीत ललितने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिन्यातील वीस दिवस कारखाना बंद असायचा. दोन हस्तकांमार्फत मुंबईत माल जायचा. त्या दोघांना पोलिस लवकरच ताब्यात घेणार आहेत.

Previous Post

IPL 2024 च्या लिलावापूर्वी या ३ खेळाडूंनी आपली नावे घेतली मागे, जाणून घ्या कोण आहेत ?

Next Post

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याविषयी उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याविषयी उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…

इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याविषयी उद्धव ठाकरेंचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

विमान अपघातात प्राण गमावलेल्या नागरिकांना भारत-इंग्लंड संघांनी वाहिली श्रद्धांजली

June 20, 2025
‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘भारत आता फक्त विचार करत नाही, दिशा देखील ठरवतो – पंतप्रधान नरेंद्र मोदी

April 1, 2025
महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी मल्टीमीडिया प्रचाराचा उपयोग जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे यांचे प्रतिपादन

March 22, 2025
मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

मोमीन शेख निसार महेबूब यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

March 3, 2025
मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

मुदखेड येथील तिसरी बौद्ध धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न

March 3, 2025
वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

वादग्रस्त सायफळ वाळू घाट पुन्हा काढला खोदून

March 3, 2025
धुळे : घरफोडी करणा-या अट्टल चोराला धुळे तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले

पंकज नगरात घरफोडी; रोख ५ हजार रूपयांसह लाखोंचे दागिने चोरून नेले

March 3, 2025
लिफ्ट मागण्याच्या बहाण्यानं दुचाकीवर बसलेल्या महिलेनं एका पिग्मी एजंटला २५ हजार रुपयांना लुटलं….

रात्री दोन दुकाने चोरट्यांनी फोडल्या मुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले

March 3, 2025

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 10, 2024
0

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 26, 2024
0

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 23, 2024
0

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 21, 2024
0

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 19, 2024
0

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 17, 2024
0

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

Load More

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
January 26, 2025
0

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 30, 2024
0

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...

बार्शी विधानसभा २४६ मधील सकाळी ७ ते ९ मध्ये झालेले मतदान.

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी

by वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 23, 2024
0

22 फेरी सुभाष देशमुख 58 हजार 27 मतांची आघाडी सुभाष देशमुख 94 हजार754 अमर पाटील 36हजार 724हजार

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • वृत्तवेध Youtube
  • वृत्तवेध Channel
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group