रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अलीकडील पतधोरण आढावा बैठकीत रेपो दरांमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला म्हणजे सलग पाचव्यांदा रेपो दर ६.५ टक्क्यांवर ‘जैसे थे’च ठेवण्यात आले आहेत. अशा स्थितीत जर तुम्हाला जर तुम्हाला तुमच्या गृहकर्जाचे व्याज जास्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गृहकर्जाचा EMI कमी करू शकता. बँक व्यवस्थापकाशी बोलून आणि हस्तांतरण कर्जाच्या EMI चा कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग मानला जातो.
आपलं स्वतःच घर घेण्याचं प्रत्येकाचं स्वप्न असतं ज्यासाठी प्रत्येकजण लोक मोठ्या प्रमाणात बचत करतात. याशिवाय जर पैसे कमी पडले तर बँका आणि वित्तीय संस्थाही कर्जाची सुविधा देते. उत्पन्नाचा मोठा भाग दरमहा गृहकर्जाच्या ईएमआयवर खर्च होतो. म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या गृहकर्जाचा EMI कमीत कमी ठेवू पाहतात. गृहकर्ज EMI नोकरदारांपासून व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकासाठी महिन्याचा सर्वात मोठा खर्च असतो. अशा परिस्थितीत कर्जदारांना ईएमआय कमी करता आला तर?
रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना दिलासा
८ डिसेंबर रोजी झालेल्या पतधोरण आढावा बैठकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दर अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे गृहकर्ज घेतलेल्या लोकांची प्रतीक्षा आणखी वाढली. मे २०२२ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान रेपो दरात २५० बेस पॉइंट वाढीमुळे गृहकर्जाचे व्याज दर गगनाला भिडले आहेत, ज्यामुळे कर्जदारांवर अतिरिक्त भार पडला आहे.
गृहकर्जाचा EMI कसा कमी करू शकता?
सध्याच्या गृहकर्जाचा EMI कमी करण्याच्या मुख्यतः दोन लोकप्रिय पर्याय आहेत. पहिला म्हणजे तुम्ही बँक मॅनेजरला मेल पाठवून होम लोनचा EMI कमी करण्याची विनंती करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही गृहकर्ज दुसऱ्या बँक किंवा NBFC मध्ये हस्तांतरित करू शकता जिथे गृहकर्जाचा व्याजदर कमी आहे.
तुम्हाला पहिल्या पर्यायानुसार EMI कमी करायचा असेल तर तुम्ही बँक व्यवस्थापकाच्या अधिकृत मेल आयडीवर ईमेल पाठवून सध्याच्या गृहकर्जाचा व्याजदर कमी करण्याची विनंती करा. तथापि लक्षात घ्या की गृहकर्ज EMI कमी करण्यासाठी तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असला पाहिजे. दुसरीकडे, जर तुम्ही कर्जाचे दुसऱ्या वित्तीय संस्थेत ट्रान्सफर करण्याचा पर्याय निवडला तर तुम्ही बँका आणि NBFC कंपन्यांच्या गृहकर्जाच्या व्याजदरांची तुलना करा आणि जिथे व्याजदर सर्वात कमी असेल तिथे गृहकर्जाचे हस्तांतरण करा.
गृहकर्ज हस्तांतरित कसे करायचे?
- होम लोन हस्तांतरित करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही विद्यमान बँकेकडून NOC (ना हरकत प्रमाणपत्र) घ्या.आता ज्या बँकेत गृहकर्ज हस्तांतरित करायचे आहे तेथे एनओसी आणि आवश्यक कागदपत्रांसह गृहकर्जासाठी अर्ज करा.
- यानंतर तुम्हाला नवीन बँक किंवा NBFC कडून गृहकर्ज मंजूरी पत्र मिळेल.
- त्यानंतर नवीन बँक गृहकर्जाची रक्कम जारी करेल आणि तुम्हाला जुने कर्ज बंद करावे लागेल.
- आता जुन्या बँकेने मालमत्ता आणि कागदपत्रे हस्तांतरित केल्यावर तुमचे ऑटो डेबिट देखील रद्द होईल.
- त्यानंतर उर्वरित प्रक्रिया पूर्ण केली केल्यावर तुमचे गृहकर्ज हस्तांतरित होईल.