लातूर येथील मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयाने खाडगांव स्मशानभूमि दत्तक घेतली असून वृक्षलागवड, स्मशानभूमि शुशोभिकरण, स्वच्छता इत्यादि उपकृम स्मशानभूमीत सातत्याने राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून महाविद्यालयाने यावर्षी एक जानेवारीला नविन वर्षाचे स्वागताला प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी स्मशानभूमित विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबवली. परिसर स्वच्छ करण्यात आलायावेळी खाडगांव ग्रामपंचायतीचे सरपंच नेताजी देशमुख, ग्रामपंचायत सदस्य दौलत साळूंखे, हनुमंत साळूंखे, अभिनंदन जाधव, अर्जून सगर यांचा महाविद्यालयाच्या वतिने प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी सत्कार केला.महाविद्यालयातील प्राध्यापकांचा वाढदिवसा निमित्ताने सत्कार यावेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ. पांडूरंग शितोळे, प्रा. मोहन बलगोरे यांचा वाढदिवस जळत्या चितेच्या बाजूला केक कापून साजरा करण्यात आला. स्वच्छतेबरोबरच अंधश्रद्धा निर्मूलन हा आमचा महत्वाचा हेतू असल्याचे मत प्राचार्य पाटील यांनी व्यक्त केले. ग्रामस्थांच्या वतिने अॅड. शरद देशमुख यांनी आपले विचार मांडले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. गुरुनाथ देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे समन्वयक प्रा. दादासाहेब लोंढे, प्रा. प्रकाश देशमुख, प्रा. संजय मोरे, प्रा. डॉ. माधव पलमंटे, प्रा.डॉ. कुमार बनसोडे, प्रा.डॉ. बाळू कांबळे प्रा. बादल बनसोडे, ग्रामस्थ सतिष देशमुख, गनी सय्यद, महावियालयातील विद्यार्थी मोठया संखेने उपस्थित होते. यात प्रामुख्याने मुलींची उपस्थिती लक्षणीय होती. या अभिनव, समाजपयोगी उपकृमामूळे महाविद्यालयाचे विविध संस्था, नागरिकांकडून विशेष कौतूक होत आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...