गेल्या कित्येक वर्षांपासुन चंद्रभागेतील होत असलेल्या वाळु उपशाविरोधात पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघ ही सामाजिक संघटना आक्रमक झालीय, यावरुन नुकतीच या संघटनेने पंढरपुरचे प्रांताधिकारी व तहसिलदार यांना बडतर्फ करण्याची मागणीही केली आसून भागवत एकादशीच्या दिवशी या संघटनेच्या वतीने वारकरी भाविकांसह चंद्रभागेच्या पात्रातील वाळुमुळे पडलेल्या खड्ड्यात बसुन आंदोलन करण्यात आले. यावेळी याच खड्डयात वारकरी भाविकांनी तसेच वासुदेवांनी किर्तन व भजन केलेे.
चंद्रभागेतील अशाच खड्ड्यात पाण्याचा अंदाज न आल्यामुळे जीव गमावलेल्या अनेक वारकरी भाविकांच्या मृत्युच्या दुर्घटनांचाही उल्लेख करण्यात आला. पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रातील अवैध वाळु उपशा विरोधात व हा प्रकार थांबवण्यास अपयशी ठरलेल्या पंढरपुरच्या प्रांताधिकारी व तहसिलदारांच्या विरोधात महर्षी वाल्मिकी संघाकडून आंदोलनं वाढत आहेत
तसतसा चंद्रभागेतील वाळु उपसा थांबण्याऐवजी वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यामुळे आम्ही सुध्दा आमच्या लोकशाहीच्या मार्गाने आंदोलनाची धार वाढवणार असुन आज चंद्रभागेच्या पात्रातील वाळुमुळे पडलेल्या खड्ड्यात वारकर्यांना सोबत घेवुन आम्ही कर्तव्यात कसुर करणार्या प्रांताधिकारी व तहलिदारांच्या विरोधात आंदोलन केले असुन जर हा वाळु उपसा थांबला नाही व तहसिलदार व प्रांताधिकार्यांची बडतर्फी झाली नाही तर अवघ्या महाराष्ट्रातील वारकर्यांना सोबत घेऊन पंढरपुरात मोठे जनआंदोलन करु असा इशारा यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकूशराव यांनी दिला आहे.यावेळी महर्षी वाल्मिकी संघाचे कार्यकर्ते व वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.