प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाला पाठी मागून वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिल्याने कोंडी येथील भाग्यश्री निवृत्ती कांबळे (वय-१७) हिचा जागीच मृत्यू झाला. ऐश्वर्या जगनाथ सोडगी (वय-१९), आदित्य सुनील भोसले (वय १४) हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अपघात सोलापूर विद्यापीठासमोर घडला. कोंडी येथून गांधींनाथा कॉलेज बाळीवेस सोलापूर निघालेल्या रिक्षाला (एम. एच.१३ सी.टी.९४७९) सोलापूर विद्यापीठाच्या समोर राष्ट्रीय महामार्गावर पुण्याकडून सोलापूरकडे चाललेल्या कारने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये बसलेली भाग्यश्री कांबळे ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली.मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सव्र्व्हस रोडवर आपटली. यामुळे तिला दुखापत झाली. रिक्षातील ऐश्वर्या सोडगी अपघातात गंभीर जखमी झाली. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहे, आदित्य भोसले आठवीत शिकणारा विद्यार्थीला उपचारासाठी अश्विनी रुग्णालयात दाखल केला. अपघाताची माहिती मिळताच कोंडी येथील तरुणांनी जखमींना सोलापूर शहरातील रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच भाग्यश्री कांबळे हिला मयत घोषित करण्यात आले. भाग्यश्रीच्या पश्चात आई-वडील, एक बहीण परिवार आहे.
Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी
छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर...