अयोध्येत रामलल्ला मंदिरात विराजमान करण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे. 22 जानेवारीला रामनगरीच्या नव्याने बांधलेल्या मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीला अभिषेक केला जाणार आहे. अशातच आज 18 जानेवारी 2024 ला राम मंदिर विधींचा तिसरा दिवस आहे. आज गर्भगृहात रामलल्ला प्रवेश करणार आहे.
यासोबतच आज राममंदिरात जलाधिवास-गंगाधीवास होणार आहे. आज रामललाचा जलाधिवास असेल. जलाधिवास म्हणजे ज्या मूर्तीला अभिषेक करावयाचा आहे ती मूर्ती शास्त्रीय पद्धतीनुसार ठराविक वेळेपर्यंत पाण्यात ठेवली जाणार आहे. यानंतर सायंकाळच्या सुमारास गंगाधीवास होईल. यामध्ये श्रीरामाच्या मूर्तीवर सुवासिक द्रव्ये लावली जाणार आहेत.
19 जानेवारी 2024 रोजी अयोध्या राम मंदिरात औषधी, केसराधिवास, घृताधिवास आणि धनाधिवास होणार आहेत. यामध्ये रामललाच्या मूर्तीवर औषधी, केशर, तूप आणि धान्य ठेवण्यात येणार आहे.