मोदी आवास घरकुल योजनेमध्ये ओबीसी प्रवर्गाच्या लाभार्थ्यांमध्ये केंद्राच्या जातीचा यादीचा निकष लावून धनगर, हटकर, वडर, कैकाडी या जातीमधील लाभार्थ्यांना मोदी आवास मधून लाभ द्यावा, अशी मागणी जिल्हा नियोजन मंडळ सदस्य प्रदीप खांडेकर यांनी केल्यानंतर अखेर शासनाने 30 जानेवारीच्या शासन निर्णयानुसार या प्रवर्गातील जातीचा योजनेमध्ये समावेश केला.
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेतील तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना जवळपास 14 हजार लाभार्थी घरकुलासाठी ड यादीतून निश्चित केले. या यादीमधील फक्त ओबीसी प्रवर्गातील लाभार्थी मोदी आवास घरकुल येण्यासाठी पात्र ठरविण्यात आल्यामुळे त्यांना लवकर घरकुलाचा लाभ मिळणार आहे.परंतु यासाठी समाविष्ट जातीचा निकष ठरवताना केंद्राच्या निकषांमध्ये धनगर, हटकर, कैकाडी, वडार, या जाती तील लाभार्थी ओबीसी प्रवर्गात निश्चित केले. परंतु मोदी आवास मध्ये फक्त राज्यातील जातीचा निकष लावल्याने या जातीचे लाभार्थी घरकुल लाभापासून वंचित वंचित राहणार आहेत. सध्या या प्रवर्गातील या जातीचा समावेश केल्यास तालुक्यातील निम्म्याहून अधिक बेघरांना याचा लाभ होणार आहे.