नीती आयोगाकडून चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती हा तालुका आकांक्षित तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. आकांक्षित तालुक्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवती तालुक्यासाठी 5 कोटी इतका निधी विशेष बाब म्हणून देण्यात येणार आहे.
नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 37.83 कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. राज्यात गतीने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता नागरीकरणाच्या प्रमाणात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सर्व महानगरपालिका –नगरपालिका – नगरपंचायती यांना विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करून देण्याची आवश्यकता विचारात घेऊन, सन 2024-25 या वर्षाकरीता चंद्रपूर जिल्ह्यासाठी 37.83 कोटी इतका विशेष अतिरिक्त नियतव्यय उपलब्ध करण्यात आला आहे.
या बाबींसाठी राहणार राखीव निधी : नियोजन विभागाच्या 18 ऑक्टोबर 2023 अन्वये निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद नावीन्यपूर्ण योजना, शाश्वत विकास ध्येय आणि मूल्यमापन सनियंत्रण व डाटा एन्ट्रीसाठी 5 टक्के निधी, महिला व बालविकास विभागाच्या सर्वसमावेशक योजनांसाठी 3 टक्के, गृह विभागाच्या योजनेसाठी ३ टक्के, शालेय शिक्षण विभागाच्या सर्वसमावेशक योजनांसाठी 5 टक्के, सांस्कृतिक कार्य विभागाच्या गड-किल्ले, मंदिरे व महत्वाची संरक्षित स्मारके इत्यादीचे संवर्धन या योजनेसाठी 3 टक्के, महसूल विभागाच्या गतिमान प्रशासन तथा आपत्कालिन व्यवस्थेचे बळकटीकरण या योजनेसाठी कमाल 5 टक्के निधी राखीव ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.