अवकाळीमुळे सोलापूर बाजार समितीत लिंबाची आवक वाढली आहे. वाढलेली आवक, मालाची घसरलेली प्रत यामुळे दरात घट झाली आहे. प्रतिकिलो १० ते ९० रुपये दराने विकल्या जाणाऱ्या लिंबाच्या दरात घसरण झाली आहे. बाजारात प्रतिकिलो १५ ते ८० रुपयांपर्यंत दर होता. गेल्या १५ दिवसांत अनेक दिवस उन्हाचा पारा हा चाळिशी पार गेला होता. त्यामुळे लिंबाला मागणी वाढली होती. त्यामुळे गेल्या आठवड्यात सोलापूर बाजार समितीत लिंबाचा दर प्रतिकिलो १० ते ९० रुपयांपर्यंत होता.
वाढता उकाडा व मालाची कमी आवक यामुळे लिंबाला चांगला दर मिळत होता. मात्र, आठवड्याच्या अखेरीस शनिवारी जिल्ह्यात झालेल्या अवकाळीमुळे फळांची गळ झाल्याने आणि दर पडण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी केलेल्या तोडणीमुळे बाजारात आवक वाढली. सोमवारी बाजारात २० क्विंटल लिंबाची आवक होती.प्रतिकिलो सरासरी ५८० रुपये दराने लिंबू विकला गेला. पुन्हा अवकाळी पडल्यास दरात घट होण्याची शक्यता आहे. मात्र, अवकाळी न पडल्याने उकाडा कायम राहिल्यास दरात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत.सोमवारी बाजारात २० क्विंटल ७० किलो लिंबाची आवक झाली. अवकाळीमुळे आवक वाढल्याने दर कमी झाले. प्रतिकिलो १५ ते ८० रुपये दराने विक्री झाली. अवकाळीमुळे प्रत घसरल्याने दरात घसरण झाली.