Thursday, July 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर लोकसभा थोडीशी कठीण, माढा जास्तच कठीण; चंद्रकांतदादांची कबुली, ४५+ घोषणा देणारी भाजप अडचणीत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 18, 2024
in solapur
0
सोलापूर लोकसभा थोडीशी कठीण, माढा जास्तच कठीण; चंद्रकांतदादांची कबुली, ४५+ घोषणा देणारी भाजप अडचणीत
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. भारतीय जनता पार्टीसाठी सोलापूर लोकसभेची निवडणूक थोडीशी कठीण आहे, मात्र माढा लोकसभेची निवडणूक जरा जास्तच कठीण असल्याची कबुली खुद्द चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. चंद्रकांतदादांच्या खुल्या कबुलीने राज्यात ४५+ घोषणा देणारी भाजप खरोखर अडचणीत असल्याची कुजबूज सुरू झाली आहे.

 

सोलापूर आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. माढ्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीमुळे भाजपची ही जागा अडचणीत असल्याची चर्चा आहे. त्या चर्चेत चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यामुळे भर पडली आहे. मंगळवेढा येथे बुधवारी चंद्रकांत पाटील गाठीभेटी करण्यासाठी आले होते, भाजप आमदार समाधान अवताडे आणि माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांशी बोलताना कामाला लागा अशा सूचना दिल्या आहेत.

 

महाराष्ट्र राज्यात महायुतीला धक्का नको; कामाला लागा –

महाराष्ट्र राज्यात महायुतीला ४५ पेक्षा एकही जागा कमी मिळणार नाही आणि ज्या तीन जागा अडचणीच्या वाटतात त्यादेखील मिळवायचा प्रयत्न करू असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. तसेच सोलापूरची निवडणूक थोडी कठीण आणि माढा लोकसभेची निवडणूक जास्त कठीण असल्याच चंद्रकांत दादा यांनी सांगितले. शिंदे गट शिवसेनेचे नेते आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू प्रा.शिवाजी सावंत यांनी मंगळवेढा येथे बुधवारी दुपारी शिवसैनिकांची बैठक घेतली होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील बैठकीला संबोधित करताना माढा आणि सोलापूर लोकसभे बाबत महत्वपूर्ण माहिती दिली.

 

चंद्रकांत पाटील यांची कबुली

सोलापूरची निवडणूक इतकी कठीण नाही असं सांगितलं. माढ्याची निवडणूक या आधी कठीण नव्हती, पण आता ती कठीण झाल्याची कबुली स्वतः चंद्रकांत दादा पाटील यांनी दिली आहे. एका सर्वेमधील झालेल्या अंदाजावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केले. सोलापूरमध्ये भाजपचे राम सातपुते आघाडीवर असल्याचे सांगण्यात आलं असून माढा लोकसभेतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचे दाखवले आहे.

 

माढ्यामुळे भाजपच्या छातीत धाकधूक वाढली

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करताच अकलूज येथील मोहिते पाटील कुटुंबाने जाहीर नाराजी व्यक्त करत निंबाळकर याना विरोध केला. भाजप भूमिका बदलत नाही किंवा उमेदवार बदलत नाही, यामुळे मोहिते पाटील परिवारातील विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हातात घेत भाजपला जबर धक्का दिला. अकलूज मतदार संघातील राजकीय घडामोडीवर खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष ठेवत उत्तम जानकर यांना ऑफर दिली होती. मात्र भाजपचा हा प्लॅन देखील फसला. माढ्याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने आणि उत्तम जानकर यांच्या भूमिकेमुळे भाजपमध्ये धाकधूक वाढली आहे.

Post Views: 80
Previous Post

अवकाळीमुळे वाढली लिंबाची आवक

Next Post

शरद पवारांचा आणखी एक डाव, बडा नेता गळाला? एकतर्फी वाटणारी जागा रेसमध्ये, भाजप संकटात

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शरद पवारांचा आणखी एक डाव, बडा नेता गळाला? एकतर्फी वाटणारी जागा रेसमध्ये, भाजप संकटात

शरद पवारांचा आणखी एक डाव, बडा नेता गळाला? एकतर्फी वाटणारी जागा रेसमध्ये, भाजप संकटात

ताज्या बातम्या

अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण मोर्चासाठी मोठ्या संख्येने या……

July 23, 2026

जनाधार फाउंडेशनच्या रक्तदान शिबिरात ४५६ जणांनी केले रक्तदान……

July 23, 2026

शिवसेना ठाकरे पक्षाने 56 समस्यांचे फलक लावून कट केला केक……

July 23, 2026

मनसेने ५६ खड्डे बुजवून केला मुख्यमंत्री यांचा वाढदिवस…….

July 23, 2026

सोलापुरात श्री जगन्नाथयात्रेचा भाविकांनी घेतला अभूतपूर्व आनंद……

July 23, 2026

संगमेश्वरच्या तरुणाईचा सहकार्य सेवेचा आविष्कार….

July 23, 2026
नाट्य अभिनेते संदीप पाठक यांची हॉटेल लि – मोर ला सदिच्छा भेट

नाट्य अभिनेते संदीप पाठक यांची हॉटेल लि – मोर ला सदिच्छा भेट

July 23, 2026
पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

पंढरपूर शहर पोलिसांची आषाढी वारीच्या अनुषंगाने देशी दारू विरुद्ध मोठी कारवाई

July 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0993532

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!