बार्शी शहरातील पाणीटंचाई दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. अगोदर चार दिवसांआड होणारा पाणीपुरवठा हळूहळू आठ दिवसांवर गेला. आता कधी आठ तर कधी १० दिवसांआड पाणी येत आहे. बार्शी नगरपालिकेचे पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे.
बार्शी शहरातील ४२२ गाडेगाव रोड भागात तर १३ दिवस पाणी आले नाही, अशी ओरड करत संतप्त महिला रस्त्यावर आल्या. शहरातील जलशुध्दीकरण केंद्र येथे जलदाय अभियंत्यासमोर तासभर ठिय्या आंदोलन करत भीक देता का भीक, पाण्याची भीक असे आर्जव संतप्त महिलांनी केले. यंदा चांदणी तलाव खूप पूर्वीच कोरडा पडला आहे.