येथील लोकनेते पॅलेस येथील बंद खोल्यामध्ये जुगार अड्डयावर प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक शुभम कुमार यांनी त्यांच्या सहकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या मंगळवारी धाड टाकलीय. या पॅलेसच्या छताखाली ३८ जुगारी आढळले. त्यांच्या ताब्यातून २,२३,९०० रुपयांची रोकड, लाखोंच्या किंमतीची चार चाकी वाहने आणि जवळपास ३० हून अधिक महागड्या किंमतीचे मोबाईल जप्त करण्यात आले. याप्रकरणी बुधवारी पहाटेपूर्वी मोहोळ पोलीस ठाण्यात ३८ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या धाडीत गोलाकार बसून ५२ पत्यांच्या पानांवर तिरट नावाचा जुगार खेळ असताना २२ जण पोलिसांच्या हाती लागले. दुसऱ्या मजल्यावर झाडा-झडतीत १६ जण तिरट खेळताना मिळून आले. त्यांच्या ताब्यातून ५००, २००, १००, ५०, २०, १० रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा एकूण २, २३, ९०० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
या कारवाईत महिंद्रा धार जिप (MH13EC6868), मारुती सुझुकी बलेनो कार (MH13DT2422), महिंद्र कंपणीची XUV (MH13AC0002), फोक्स वॅगन कंपणीच विटो कार (MH13BN 3312), मारुती सुझुकी कंपणीची स्विफ्ट डिझायर कार (MHI3DE7740) आणि मारुती सुझुकी कंपणीची स्विफ्ट डिझायर कार (MH42AL4554) अशा कंपनीची महागडी वाहने जप्त करण्यात आलीत. या छाप्यात ॲपल सॅमसंग विवो अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे ३० हून अधिक मोबाईल जप्त करण्यात आले.
१) रियाज बासु मुजावर (वय-३८ वर्षे, रा. दत्तनगर मोहोळ), २) विनायक निलकंठ ताकभाते (वय- ४३ वर्षे, रा. अवंतीनगर, जुना सोलापूर नाका, सोलापूर), ३) फारुख शेख याकुब (वय ३८ वर्षे, रा. ओमनगर, सुरत, राज्य गुजराथ), ४) मितीन सारंग गुंड (वय ३७ वर्षे, रा. अनगर, ता. मोहोळ), ५) ओंकार विजय चव्हाण (वय २७ वर्षे, रा. चिंचनाका, चिपळूनण, जि. रत्नागिरी), ६) राजू लक्ष्मण भांगे (वय २८ वर्षे, रा. मार्डी, ता. उत्तर सोलापूर), ७) महादेव बंडोबा पवार (वय-३५ वर्षे, रा. १४७, दक्षिण कसबा, सोलापूर), ८) मनोज नेताजी सलगर (वय-४२ वर्षे, रा. नवीपेठ, सोलापूर) ९) स्वप्निल प्रविण कोठा (वय-३५ वर्षे, रा. राजीव नगर, सोलापूर) १०) रोनक नवनीत मर्दा (वय-२८ वर्षे, रा. मर्दा मंगल कार्यालय, सोलापूर), ११) हर्षल राजेंद्र सारडा (वय-३५ वर्षे, रा. वर्धमान नगर, सोलापूर), १२) कृष्णा अर्जुन काळे (वय-४७ वर्षे, रा. संजय गांधीविजापूरनाका, सोलापूर) १३) अनिल किसन चव्हाण (वय ५२ वर्षे, रा. अलराईन मगर, सांगोला), १४) धानप्पा प्रकाश भदरे (वय-४६ वर्षे, रा. नवी पेठ, सोलापूर), १५) अबरार करीम फकीर (वय-५६ वर्षे, रा. उकताड गणेश मंदीर, चिपळूण, जि. रत्नागिरी), १६) लखन जगदीश कोळी (वय-३३ वर्षे, रा.समर्थ नगर, मोहोळ), १७) सोमनाथ दादासाहेब मोरे (वय-२९ वर्षे, रा. दत्त नगर, मोहोळ), १८) महादेव मुरलीधर दगडे (वय-३९ वर्षे, रा. करोळे, ता. पंढरपूर), १९) राम बलभिम कदम (वय-५४ वर्षे, रा. अनगर, ता. मोहोळ), २०) कृष्णा कल्याण राऊत (वय-३७ वर्षे, रा. बागेचीवाडी, अकलूज, ता. माळशिरस), २१) विलास धर्मराज कडेकर (वय-४० वर्षे, रा. कुप्पा, ता. वडवणी, जि. बीड), २२) सुशिल कैलास लंगोटे (वय-४४ वर्षे, रा. श्रीराम नगर, माढा) अशी आरोपींची नांवे आहेत.