Monday, May 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वनस्पती तेल उत्पादने, उत्पादन आणि उपलब्धता (नियमन) आदेश, 2011 चे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई होणार

तरुण भारतbyतरुण भारत
October 23, 2025
in india
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्‍ली – ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अखत्यारितील अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने वनस्पती तेल उत्पादने, उत्पादन व उपलब्धता (नियमन) आदेश, 2011 (व्हीओपीपीए) आदेशात एक महत्त्वपूर्ण सुधारणा अधिसूचित केली आहे. सुधारित व्हीओपीपीए आदेश, 2025 चे उद्दिष्ट भारतातील खाद्यतेल क्षेत्राचे नियमन, देखरेख आणि पारदर्शकता आणणे हे आहे. 

सुधारित आदेशानुसार, सर्व खाद्यतेल उत्पादक, प्रक्रिया करणारे, मिश्रण करणारे, पुन्हा पॅक करणारे आणि खाद्यतेल पुरवठा साखळीत सहभागी असलेल्या इतर सर्व घटकांना व्हीओपीपीए आदेशांतर्गत नोंदणी करणे आणि ऑनलाइन पोर्टलद्वारे मासिक उत्पादन आणि साठा अहवाल सादर करणे बंधनकारक आहे. 

हे वाढीव नियमन अचूक माहिती संकलन, प्रत्यक्ष वेळेगणिक निरीक्षण आणि धोरण सुधारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पुरवठा साखळीची स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारच्या प्रयत्नांचा हा एक  भाग आहे. 

खाद्यतेल उद्योगाकडून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील खाद्यतेल उत्पादकांनी  मोठ्या संख्येने राष्ट्रीय एकल खिडकी पोर्टलवर नोंदणी केली आहे. दर महिन्याला ते आपापले अहवाल  https://www.edibleoilindia.in या संकेतस्थळावर सादर करीत आहेत.

याद्वारे उद्योगातील भागधारकांकडून पारदर्शकता आणि अनुपालनाप्रती असलेली दृढ वचनबद्धता दिसून येते. खाद्यतेलांचे उत्पादन, प्रक्रिया, मिश्रण किंवा वेष्टनांची बांधाबांध या कामी सहभागी असलेल्या सर्व एककांना सुधारित व्हीओपीपीए  आदेशानुसार खालील गोष्टींचे पालन करणे आवश्यक आहे: खाद्यतेलाशी संबंधित सर्व एककांनी https://www.nsws.gov.in येथे राष्ट्रीय एकल खिडकी प्रणालीद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर, एककांनी त्यांचे मासिक उत्पादन, साठा आणि उपलब्धता विवरणपत्र https://www.edibleoilindia.in द्वारे दाखल करावे.

सुधारित व्हीओपीपीए  आदेश, 2025  चे पालन न केल्यास ते उल्लंघन मानले जाईल आणि नोंदणी न करणाऱ्या किंवा त्यांचे विवरणपत्र सादर न करणाऱ्या एककांना सुधारित व्हीओपीपीए  आदेश आणि सांख्यिकी संकलन कायदा, 2008  च्या तरतुदींनुसार दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल.

प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी विभाग, अनुपालन न करणाऱ्या एककांची तपासणी मोहीम आणि क्षेत्रीय पडताळणी सुरू करण्याची योजना आखत आहे. या तपासणीचा उद्देश अनुपालनाचे गांभीर्य अधिक मजबूत करणे आणि खाद्यतेल क्षेत्रासाठी राष्ट्रीय डेटा परिसंस्थेची अखंडता राखणे हे आहे.

सुधारित आदेशाचे पालन करणे ही केवळ एक नियामक आवश्यकता नाही – तर ते भारताच्या अन्न सुरक्षा पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान आहे. हा उपक्रम चांगल्या नियोजनाला, माहितीपूर्ण निर्णय घेण्यास प्रोत्साहित करतो आणि अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक खाद्यतेल परिसंस्थेला चालना देतो. विभाग सर्व भागधारकांना लवकरात लवकर पूर्ण अनुपालन सुनिश्चित करण्याचे आणि देशात एक मजबूत आणि विश्वासार्ह डेटा-चालित खाद्यतेल क्षेत्र तयार करण्यात भागीदारी करण्याचे आवाहन करत आहे.

Post Views: 24
Previous Post

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी जिनेव्हामधील युएनसीटीएडीच्या 16व्या अधिवेशनात भारताच्या प्रतिनिधिमंडळाचे केले नेतृत्व

Next Post

आय.आय.एम.सी. 2027 चे शैक्षणिक सत्र बडनेराच्या नवीन इमारतीत सुरू करण्याचे निर्देश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

आय.आय.एम.सी. 2027 चे शैक्षणिक सत्र बडनेराच्या नवीन इमारतीत सुरू करण्याचे निर्देश

ताज्या बातम्या

विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने महानगरपालिकेत फोडल्या घागरी

May 11, 2026

डॉ मुकुंद लिमये यांच्या शिबिराचा १२८ जणांनी घेतला लाभ

May 11, 2026

लिंबू विकण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्याला भरधाव कारने उडवले

May 11, 2026

निपुत्रिक आईला बाळासाठी छळले ; पतीवर गुन्हा दाखल

May 11, 2026

खबरदार झाडाला फलक ठोकाल तर थेट होईल जेल

May 11, 2026

घटस्फोटीत विधुर यांचे विवाह होणे गरजेचे चंद्रकांत पवार

May 11, 2026

सोलापुरचे एसटी प्रवासी करणार सुरक्षित प्रवास ; वाहकांची अल्कहोल तपासणी सुरू

May 11, 2026

B2 आणि गुंठेवारीचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावू #viral #marathinews #solapurnews

May 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0858540

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697