शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अक्कलकाेट राेड, हाेटगी राेड, जुळे साेलापूर, हत्तुरेवस्ती, शंकरनगर, नई जिंदगी भागात झाडे उन्मळून रस्त्यावर, विजेच्या तारांवर काेसळली. या भागातील वीजपुरवठा सायंकाळी साडेपाच ते नऊ वाजेपर्यंत बंद हाेता. महापालिकेचे आपतकालीन पथक, वीज वितरणच्या कर्मचाऱ्यांना तारांवर काेसळलेली झाडे हटविण्यासाठी परिश्रम घ्यावे लागले.यादरम्यान महापालिकेच्या आपतकालीन कक्षात विविध भागांत नुकसान झाल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. नगर अभियंता सारिका आकुलवार, उपअभियंता युसूफ मुजावर यांनी नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना या भागात जाऊन रस्त्यावर पडलेली झाडे, साहित्य हटविण्याच्या सूचना केल्या.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...