धारावीतील गोदामाला रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशनम दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तात्काळ युद्ध पातळीवर आग विझवण्याचे काम सुरु केले.आग विझवण्यात त्यांना यश मिळाले आहे. सध्या येथील परिसरात कुलिंग ऑपरेशन सुरु आहे. पुढील तपास सुरू आहे.
जखमींची नावे –
सलमान खान (वय- २६), मनोज (वय – २६), अमजद (वय – २२), सल्लाउदिन (वय – २८), सैदुल रेहमान (वय – २६), रफिक अहमद (वय – २६)