अक्कलकोट येथील जमिनी खरेदी केली असून सदर मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावे कमी करून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तीन हजाराची लाच घेणाऱ्या भूमी अभिलेख कार्यालयातील परिरक्षण भूमापकाला लाच प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. संतोष रामलिंग हंचे, पद – परिरक्षण भूमापक, भूमी अभिलेख कार्यालय, अक्कलकोट वर्ग 3 रा. सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी भवानी पेठ सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सोमवार 27 मे रोजी ही कारवाई झाली. यातील तक्रारदार यांनी अक्कलकोट येथील जमिनी खरेदी केली असून सदर मालमत्तेच्या मालमत्ता पत्रकावरून खरेदी दिलेल्यांची नावे कमी करून तक्रारदार यांचे नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी भूमी अभिलेख कार्यालय, अक्कलकोट येथे अर्ज दिला होता.
सदर अर्जाच्या अनुषंगाने मालमत्ता पत्रकारावर मयत व्यक्तीचे नाव महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 155 प्रमाणे नोटीस काढून व त्यांच्या वारसांच्या नावावर कलम 258 प्रमाणे नोटीस काढून नमूद नावावर कंस करून त्याप्रमाणे फेर नोंद घेण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय अक्कलकोट येथील परिरक्षण भूमापक श्री संतोष रामलिंग हंचे यांनी तक्रारदार यांच्याकडे 5000 रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत अँटी करप्शन ब्युरो सोलापूरकडे दिनांक 27/05/24 रोजी तक्रार प्राप्त झाली. सदर तक्रारीवरून पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील लोकसेवक संतोष रामलिंग हंचे यांनी तक्रारदार यांना महा. जमीन महसूल अधि. कलम 155 प्रमाणे खरेदी दिलेल्या नावावर कंस करून त्याप्रमाणे मालमत्ता पत्रकात नोंद घेण्यात आलेले आहेत असे सांगून केलेल्या कामाचा मोबदला म्हणून व महा. जमीन महसूल अधि. क. 258 प्रमाणे मयत व्यक्तीच्या नावावर कंस करून त्याप्रमाणे मालमत्ता पत्रकावर नोंद घेण्यासाठी प्रलंबित राहिलेल्या कामाकरिता तडजोडी वरून 3000/- रुपये लाचेची मागणी केले. त्यानंतर सापळा कारवाई वेळ श्री. हंचे यांनी तक्रारदार यांच्याकडून 3000/- रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.