पालघर Dist : बेरोजगारांना नोकरीच्या नावावर लुटण्याचं काम सद्या सुरू आहे. मुलांकडून परीक्षेसाठी शुल्क घतले जाते. आणि मग पुढे पेपर लीक केले जातात. एकदा का वयोमर्यादा निघून गेली तर सर्व काही संपतं. त्यामुळे राज्यात बेरोजगारी वाढली आहे. या वाढत्या बेरोजगारी महाराष्ट्र हे बेरोजगारांचे राज्य झालं आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
कोकण पदवीधर मतदासंघासाठी होत असलेल्या निवडणुकीच्या पार्श्भूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश किर यांच्या प्रचारासाठी बुधवारी काँग्रेस भवन मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते. पुढे ते बोलताना म्हणाले की, आज अनेक पदवीधर मुल मुली बेरोजगार आहेत. अनेक पदवीधर रोजगार हमीच्या कामावर जातात. पालघर मध्ये महाविकास आघाडीच्या चुकीमुळे भाजपा खासदार इथे निवडून आला . त्यामुळे त्यांना असं वाटते की सर्व आमच्याकडे वळले. आमचा धनुष्य , आमची घड्याळ चोरून नेली पण आमच्या कडे मशाल, तुतारी आलीच . आता यांची वाजवायची वेळ आहे असं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं.
या निवडणुकीत आम्ही नंबर १ वर आहोत. मात्र जी लोकं २ नंबरची आहेत ती २ नंबर वरच आहेत असंही ते भाजप वर टीका करत म्हणाले. यावेळी भाजपा सरकार वर निशाणा साधत पटोले म्हणाले की, जनतेला लुटण्याच्या कामा व्यतिरिक्त या सरकार ने काही केलं नाही. संविधानाला संपवण्याचा काम हे करता आहेत. हा आरोप नाही तर हे सत्य आहे.
वाढवण बंदरा विषयी बोलताना पटोले म्हणाले की, सरकारच्या मनात पाप आहे.त्यांना पालघर जिल्ह्यातली निसर्ग संपदा संपवायची आहे. यावेळी वसई झालेल्या तरुणीच्या हत्ये विषयी बोलताना पटोले म्हणाले की, वसई मध्ये झालेली घटना दुर्दैवी आहे . महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. सरकारच्या चुकीमुळे या मुलीचा मृत्यू झाला. सरकार अशा घटना थांबवण्यात अयशस्वी ठरलं आहे.






















