शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापेक्षा अधिक मताधिक्य देत मतदारांनी शिवसेनेवर विश्वास टाकल्याचं शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात बोलत होते.</p>
ठाणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर हे शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले आपण जिंकले असून हा विजय लखलखीत आहे. शिवसेनेचा पंरपरागत मतदार कुठंही वळलेला नाही, तो शिवसेना आणि धनुष्यबाण यासोबतच असल्याचं त्यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला हिंदुत्वाची अॅलर्जी निर्माण झाली असून त्यांना मत मागण्यासाठी बाळासाहेबाचं नाव घेण्याचं आणि फोटो लावण्याचा अधिकार राहिलेला नाही, अशी टीका शिंदे यांनी केली. भविष्याचा विचार करुन आपण सगळे महायुती म्हणून मिळून काम करुन असं शिंदे म्हणाले.