वाटुर प्रतिनिधी अयाज पठाण
आर्ट ऑफ लिविंग आणि आकार फाउंडेशन यांच्या माध्यमातून अकोली तालुका परतुर येथे शिवकालीन दगडी बंधारा चे काम मे महिन्यामध्ये सुरू करण्यात आले होते त्या ठिकाणी निर्माण केलेला बंधारा पूर्णत्वास नेत पावसाच्या पहिल्याच पावसामध्ये येथील बंधारात तुडुंब भरून झाला आहे जवळपास एक किलोमीटर पर्यंत बंधाऱ्यामुळे पाणी क्षेत्र हे थांबल्यामुळे या भागातील विहीर आणि बोरवेल्सला खूप मोठा फायदा झाला त्यामुळे या भागातील शेतकरी अतिशय समाधानी आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आर्ट ऑफ लिविंग यांच्या माध्यमातून मागील दोन वर्षापासून गावे पाणीदार करण्यासाठी प्राध्यापक डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ हे अथक परिश्रमण ठाणे जालना तालुक्यातील गावांसाठी करत आहे
मागील दोन वर्षापासून जलतरा प्रकल्पाने परतुर आणि मंठा तालुक्यामध्ये भूगर्भाचे पाणी पातळी वाढवण्यासाठी अतिशय मोलाचे योगदान दिले आहे या योगदाना साठी आणि त्याचे परिणाम स्वरूप पाहण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेत जलतारा प्रकल्प संबंध महाराष्ट्रात नेण्यासाठी आश्वासन दिले होते या जलतरा प्रकल्पाला जोड म्हणून प्राध्यापक वायाळ यांनी गाव तिथे शिवकालीन दगडी बंधारा निर्माण करण्याचे काम येणाऱ्या आगामी दिवसांमध्ये करण्याचा संकल्प केला आहे त्याची नांदी अकोली गावापासून सुरुवात झाली आहे.
दरम्यान परतूर आणि मंठा तालुक्यामध्ये दरवर्षी पाऊसमान कमी होतो तेव्हा जेवढा पावसाळ्यात पाऊस होतो त्याचा प्रत्येक थेंब आपल्या शिवारातील भूगर्भामध्ये मुरावा आणि या भागातील पाणी पातळी वाढावी शेतकऱ्यांच्या नदीला विहिरीला बोरवेसला पाणी राहावे आणि आर्थिक समृद्ध होत आत्मनिर्भर होण्यासाठी आर्ट ऑफ लिविंग आणि आकार फाउंडेशन अविरत काम करणारा असल्याचे प्राध्यापक वायाळ यांनी सांगितले