*”माझा गाव माझा अभिमान” या संकल्पनेतुन सिमेंट खुर्च्यांचे लोकार्पण…!*
हाणेगाव प्रतिनीधी /फारुख पटेल: हाणेगाव येथे “माझा गाव माझा अभिमान” या संकल्पनेतुन लोकसहभागाच्या माध्यमातुन सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या व्यक्तीकडुन बसस्थानक परीसरासह वर्दळीच्या ठिकाणी सिमेंटच्या २५ खुर्च्या बसवुन लोकार्पण करण्यात आले.
तालुक्यात सर्वात मोठी बाजारपेठ असल्यामुळें येथे नेहमी लोकांची वर्दळ असते प्रवाशांना बसण्यासाठी बसस्टॉप नसल्यामुळे गैरसोय होऊ लागल्यामुळें कांही सुशिक्षीत नागरीक समाजसेवक पुढे येऊन “माझा गाव माझा अभिमान” या संकल्पनेच्या माध्यमातुन लोकसहभागातुन वर्दळीच्या ठिकाणीं जसे बस्थानक,ग्रामपंचायत कार्यालय परीसर,मन्मथ स्वामी मंदीर,कृ.उ.बा.समीती कमानी समोर,सिध्देश्वर मंदीर परीसर, बाजारलाईन,जामा मस्जीद परीसर,ध्याडे दुकान आदी परीसरात सिमेंटच्या २५ खुर्च्या बसवुन हा उपक्रम राबविण्यात आला
तर गावातील दानशुर व्यक्ती व्यापारी बालाजी पोकलवार सावकार,रमेश सावकार राणे,हज्जु सेठ चमकुडे,उपसरपंच मुजीपोद्दीन चमकुडे,विस्तार अधीकारी बालाजी उमाटे, ग्रा.पं.सदस्य दिलीप बंदखडके,सहशिक्षक दिलीप वाडीयार,सहशिक्षक बालाजी नाईकवाडे,सहशिक्षक संजय नाईकवाडे,ॲड.वीरभद्रप्पा माळगे,शिवकांत माळगे,ग्रा.पं.सदस्य उमाकांत पंचगल्ले, चंद्रकांत मरपल्लीकर,डॉ. व्ही.धुमाळे,डॉ.वझरकर,वसंत आडेकर,मुबीन शेख,यादव सुर्यवंशी आदींनी या उपक्रमासाठी योगदान दिल्याने गावातील व परीसरातील लोकांनी या कार्याचं कौतुक गेले.