.भोकरदन युवराज पगारे,
भोकरदन येथील पेशवे नगरात नव्याने बांधण्यात आलेल्या भव्य मंदिरामध्ये वेदमंत्रांच्या जयघोषात मंगल वाद्यामध्ये श्री सिद्धिविनायक गणपती, नर्मदेश्वर शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करुन, व मंदिराचे कलशारोहण वेरूळ येथील टाकाश्रमाचे विद्यावामदेव तीर्थ स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर श्री कालिदास महाराज आजुबाई संस्थान आनवा, श्री सुभाष महाराज झाल्टे शिवना ,,श्री दीपक महाराज अन्वा ,श्री अशोक झाल्टे गुरुजी, भागवताचार्य उंडणगाव, श्री विशाल आनंद महाराज महामंडलेश्वर,श्री सदाशिव शास्त्री महाराज शनी उपासक संस्थान सिल्लोड यांची प्रमूख उपस्थीती होती .
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला भोकरदन चे आमदार संतोष दानवे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी नगराध्यक्ष ऍड हर्षकुमार जाधव
यांनीही उपस्थित राहून दर्शन व प्रसादाचा लाभ घेतला..
पेशवे नगरच्या श्री सिद्धिविनायक गणपती संस्थान च्या वतीने प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळ्यानिमित्त तीन दिवसीय पंचकुंडात्मक महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्राणप्रतिष्ठा, व पंचकुंडात्मक महायागाचे प्रधानाचार्य दिपक महाराज श्री आजुबाई संस्थान अनवा , व वेद शास्त्र संपन्न राजू मांडे पैठणकर, शाम शास्त्री मंगरूळकर, सुनील बिडकर, जयंतराव जोशी, श्रीपाद झाल्टे, राहुल मुळे, या ब्रह्मवृंदांनी पौरोहित्य केले .
शुक्रवारी श्री गणेश स्मरण प्रायश्चित्त संकल्प करून कार्यक्रमाला सुरुवात झाली, देवता मंडळाची स्थापना करून श्री गणेश व शिव या स्वाहाकार व जलाधिवास सायंकाळी पूजन नैवेद्य व महाआरती संपन्न झाली. शनिवारी स्थापित देवता पूजन मंदिर गृहप्रवेश श्री गणेश मोदक स्वहाकार दुर्वा स्वाहाकार देवतांचे धान्याधीवास , परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराजांच्या सिद्ध पादुका चे पूजन व महाआरती करण्यात आली यावेळी श्री लक्ष्मीकांत महाराजांच्या जीवन चरित्रावर भागवताचार्य अशोक झाल्टे गुरुजी यांनी प्रवचन केले .
ज्येष्ठ कृष्ण नवमी रविवारी सकाळी श्री सिद्धिविनायक महागणपती व नर्मदेश्वर शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करुन कलशारोहण करन्यात आले त्यानंतर बलिदान महानैवेद्य दाखवून पूर्णाहुती व महाआरतीने कार्यक्रम संपन्न झाला, यावेळी उपस्थित भाविक भक्तांनी भंडारा महाप्रसादाचा लाभ घेतला.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे प्रमुख यजमान मकरंद देशपांडे, कृष्णा देशपांडे( नाशिक),राजेंद्र जोशी गजानन देशपांडे सुनील देशपांडे ,प्रवीण देशपांडे ,महेश देशपांडे, संतोष जोशी, सुरेंद्र देशपांडे ,मंगेश देशपांडे ,अनिल देशपांडे लक्ष्मीकांत कुलकर्णी अविनाश देशपांडे ,विजय देशपांडे ,सुधीर देशपांडे, यांच्यासह श्री सिद्धिविनायक संस्थांच्या सर्व पदाधिकारी व भक्तांनी कार्यक्रमासाठी यशस्वी परिश्रम केले.
या कार्यक्रमाला भोकरदन शहरास छत्रपती संभाजी नगर जालना सिल्लोड सह परिसरातील सर्व भाविक भक्त
महिलांची ही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.