देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त सोयगाव येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे वृक्ष लागवड
सोयगाव,दि.१७ ( प्रतिनिधी)
देवशयनी आषाढी एकादशी निमित्त स.न.१९९९ ते २००० चे वर्ग मित्र यांच्याकडून सोयगाव शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर दयाळनगर येथे प्रत्येकी एक झाड असे मिळून १५ ते २० झाडे श्री स्वामी समर्थ मंदिर येथे शालेय मित्र यांनी साफसफाई करून वृक्ष लागवड केले.श्री स्वामी समर्थ मंदिर दयाळनगर येथे नारळ,जांभूळ,पेरू,असे झाडे लावून प्रत्येकांनी आपल्या घरासमोर एक झाड लावा असे नागरिकांना आवाहन केले.
तसेच सोयगाव शहरातील जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिर येथे जाऊन सुद्धा शालेय मित्र मंडळ यांनी भैरवनाथ मंदिर येथे एक नारळाचे झाड लावून प्रत्येकांनी आपल्या दारी एक झाड लावा ही संकल्प सुरू केली.यावेळी गणेश आगे,संजय कासार,योगेश बोखारे,बापू म्हस्के,प्रमोद तायडे,राजू इंगळे,देवेंद्र तेलंगे,दिलीप तायडे,रमेश राठोड,शंकर काळे,विनोद सोहनी,रुषीकेश काळे,शांताराम ढमाले,राजेंद्र बागुल आदींसह मित्रपरिवार उपस्थित होते.



















