सोमठाणा येथील पोलीस शिपाई माधव वंचेवाड यांना आखेरची बंदुकीच्या शोक सलामी देऊन शासकीय ईतमामात अंत्यसंस्कार
हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यु झाला होते .
उमरी ( प्रतिनिधी )
उमरी तालुक्यातील सोमठाणा येथिल रहिवाशी पोलीस शिपाई माधव राजाराम वंचेवाड यांचे हृदय विकाराच्या तिव्र झटक्याने १६ जुलै २०२४ रोजी निधन झाले आहे त्याचा शासकीय इतमात त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आले आहे .
माधव वंचेवाड यांचे मुत्यू समयी अंदाजे ५० वर्ष वय होते
माधव वंचेवाड हे मुदखेड पोलीस ठाणे येथे गेल्या ६ वर्षा पासून पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते
पोलीस शिपाई माधव वंचेवाड अचानक तबेत अस्वस्त वाटू लागल्याने दि १६ रोजी मंगळवारी घरी आले अंदाजे दोन वाजल्या च्या सुमारास त्यांना मळमळ त्रास जाणून लागला
त्याच दरम्यान त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला हे काहीच बोलत नाही म्हणून त्यांच्या पत्नी सावित्राबाई वंचेवाड व मुलगा त्यांना तात्काळ उमरी येथील सचिन गळगे खाजगी रुग्णालयात येथे दाखल केले होते मात्र येथील डॉक्टरांनी त्यास उपचार करुन नांदेड येथे विष्णुपुरी जाण्यासाठी रवाना केले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्ये रस्त्यातच
हृदय विकाराच्या झटक्याने
त्यांचे १६.७.२०२४ मंगळवार रोजी
मृत्यू झाला
माधवराव वंचवाड हे अनेक पोलिस ठाणे मध्ये उत्तम रित्या कर्तव्य बजावले होते ते आता मुदखेड ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होते यांच्या जन्मगावी सोमठाणा येथे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले पोलिस दला मार्फत शासकीय मानवंदना देऊन बंदुकीच्या फैली झाडुन
माधव राजाराम वंचेवाड यांना शेवटचा निरोप देण्यात आला . पोलिस शिपाई माधव राजाराम वंचेवाड याच्या यांच्या पंश्चात पत्नी , दोन मुले व एक मुलगी आसा परिवार आहे यावेळी अंत्यसंस्कारास अर्धापूर महामार्ग विभागाचे प्रमुख उपविभागीय अधिकारी डॅनियल बेन,
पोलीस निरीक्षक मुदखेड वसंत सप्रे, उमरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माने व पोलीस हैबतकर
सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे मॅडम तामसा, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी शिंदे,
मुदखेड पोलीस स्टेशन स्टाफ तायवडे, जमादार बलविंरसिंग ठाकूर, मधुकर पवार, अविनाश पांचाळ, उद्धव पांचाळ, सुनील आडे, सुरेश दवणे, रमेश बोईनवाड अरविंद सिंगारपुतळे,
पोलीस लक्षीमण सोनपारखे पोलिस साईनाथ रिठ्ठेवाड बालाजी पतोजी शिक्षक उपसरपंच लक्षीमण यलमलवाड सुधाकर चित्ताके पोलिस पाटील पांडुरंग बाळोजी कोल्होवाड टटामुक्ती अध्यक्ष डि जी तुपसाखरे पत्रकार माजी उपसरपंच जळबाजी यलमलवाड गणपत रिठ्ठेवाड
अर्धापूर मुदखेड भोकर उमरी पोलीस अधिकारी कर्मचारी व गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला पुरुष अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते