लिपिकाचे कामे दिलेल्या त्या दहा शिक्षकांना शाळेत पाठवा.
जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसह शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी सोमवार पासून आमरण उपोषणाचा ईशारा
भोकरदन : भोकरदन तालुक्यासह जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या उर्दू व मराठी माधयमिक मध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यासह मोडकळीस आलेल्या इमारती दुरुस्ती करण्याच्या मागणी सह अन्य मागण्यांसाठी भोकरदन येथे गट शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर सोमवार पासून बळीराजा फाऊंडेशनचे अध्यक्ष, शिक्षणप्रेमी नारायण लोखंडे यांनी आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे.या संदर्भात विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जालना जिल्ह्यात शिक्षण विभागात मोठा भ्रष्टचार सुरु असून नियमबाह्य कामे सुरु आहेत.
बालकांच्या मोफत व सक्तीच्या अधिनियम 2009 कलम 27 नुसार जनगणना, आपत्ती व्यवस्थापन, सार्वत्रिक निवडणूक याशिवाय कोणतेही कामं देता येत नसताना कायद्याचा भंग करून कार्यालयात शिक्षकांना लिपिक, शालार्थ समन्वयक, गटसमन्वयक यांची कामे दिलेली आहेत. त्यामुळे RTE कायदा भंग झालेला आहे.
यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद अंतर्गत जालना,घनसावंगी,अंबड, मंठा,परतूर,बदनापूर,जाफ्राबाद,भोकरदन येथील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात लिपिक,शालार्थ समन्वयक पदावर शिक्षकांचीच नियुक्ती करण्यात आलेली आहे.हा प्रकार मागील दहा वर्षांपासून सुरु असल्याने विध्यार्थ्यांचे कधीही न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान झाले आहे.याबाबत गत वर्षी बळीराजा फाऊंडेशन च्या माध्यमातून जिल्हा प्रशासन व विभागीय कार्यालयाचे वेळोवेळी शांततेच्या मार्गाने आंदोलन करून लक्ष वेधण्यात आले होते.विभागीय आयुक्त कार्यालयासमोर 7 मार्च रोजी संबंधित मागण्यांसाठी उपोषण केले होते. त्याची दखल घेत तत्कालीन आयुक्त मधुकर राजे आर्दड यांनी या प्रकरणाची उपायुक्तां मार्फत चोकशी लावून चार दिवसात अहवाल सादर करण्याचे सांगितले होते.त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी सर्व नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून कार्यालयीन कामासाठी कार्यरत असलेले 21 शिक्षक कार्यमुक्त केले बाबत आयुक्तांना
15 एप्रिल रोजी पत्राद्वारे कळविले होते.मात्र शाळा सुरु होताच पुन्हा 10 शिक्षकांना 5 जुलै रोजी कार्यालयीन कामासाठी कायमस्वरूपी रुजू केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विध्यार्थ्यांनेचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अगोदरच जिल्ह्यात 600 हून अधिक शिक्षकांची पदे रिक्त असतांना पुन्हा शिक्षकांनाच कार्यालयात नियुक्ती देणे अंत्यत चुकीचे असून वरिष्ट कार्यालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळं मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी दिनांक 5 जुलै 2024 रोजीचा कार्यालयीन कामासाठी 10 शिक्षकांचा काढलेला आदेश जिल्हा परिषद अधिनियम 1961 मधील कलम 267 क नुसार आपण स्वतः रद्द करून शिक्षकांना फक्त अद्यापणाचे कार्य करू देणे .वारंवार नियमबाह्य कामे करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणे,मागील अनेक वर्षांपासून सतत शाळेत गैरहजर असणाऱ्या
21 शिक्षकांनी लिपिकाचे कामे केली असून अधिकचे प्रत्यक्षात शिक्षकांना असलेले वेतनश्रेणी ही लिपिकापेक्षा जास्त आहे तरीही कमी वेतनश्रेणी असलेल्या लिपिकाचे काम देऊन जादा वेतन अदाई देऊन कमी वेतनाचे काम केल्याने शासनाचे आर्थिक नुकसान झालेले आहे. शासनाच्या वतीने संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातून वसूल करून बाबत संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करणे.
माहे मार्च महिन्यात उपायुक्तांमार्फत करण्यात आलेल्या चौकशी अहवाल मिळणे बाबत.व योग्य ती कार्यवाही करणे.भोकरदन तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी व उर्दू शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्यासह जिल्ह्यातील 600 रिक्त जागा भरणे.
धोकादायक बनलेल्या जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती करणे. मंजूर शाळांचे बांधकाम सुरु करणे.आदी मागण्यांसाठी 22 जुलै सोमवार रोजी पासून आमरण उपोषणास सुरुवात होत आहे.पालकांनी विध्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन नारायण लोखंडे यांनी केले.