पालखी महामार्गाच्या रस्त्याच्या अपुर्ण कामामुळे येरमाळ्यातील रस्ते चिखलमय .
– तभा वृत्तसेवा येरमाळा – वाहतूक रस्ते विकास कामामुळे गावच्या सौंदर्यात भर पडते असे म्हणतात.येरमाळा गावातुन गेलेल्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गामुळे मात्र गावचे आरोग्य धोक्यात आले आहे. रस्त्याच्या अपुर्ण कामामुळे गावातील रस्ते जलमय झाल्याने अनेक साथीच्या रोगांसह लहान मुलांना डेंगु सदृश्य रोगांची लागणं होत आहे.
येरमाळा गावातुन खामगाव पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग गेला असुन या पालखी मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी गावातुन गेलेल्या रस्त्याच्या नाल्यांचे काम तसेच गावातील अंतर्गत जोड रस्त्याचे काम न झाल्याने रस्त्यावरील वाहून जाणारे पावसाचे पाणी गावातील वस्त्यावरील रस्त्यावर साठत आहे.तर कांही वस्तीत राहणाऱ्या लोकांच्या घरात पावसाचे शिरत आहे.
गावातुन गेलेल्या पालखी महा मार्गाच्या रस्त्याची उंची जुन्या रस्त्याच्या तुलनेत वाढली आहे. त्यामुळे गावातील रस्ते व गावातील नाल्याचे पाणी वाहून जात नसल्याने आणि महामार्गवरुन वाहणारे पाणी गावातील रस्त्यावर,साचत आहे. लोकांच्या घरात पाणी जात आहे. या पाण्यामुळे गावातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते पावसाचे पाणी साचत असल्याने जलमय,दलदलीचे झाले आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्र,बस्थानका मागील वस्तीत जाणाऱ्या सिमेंट काँक्रिट रस्याची अवस्था कांही अशी झाली आहे.
गावातील सिद्धार्थ नगर वस्तीत ही रस्याची उंची वाढल्याने शिवाय पावसाचे पाणी वाहून जाण्याचे नोयोजन रस्त्याच्या कंत्राटी मेगा कंपनीने केले नसल्याने या वस्तीच्या अनेक घरात पावसाचे पाणी शिरत आहे.शिवाय पावसाच्या पाण्याचा निचारा होत नसल्याने कांही लोकांच्या घराच्या दारात साठणाऱ्या पाण्यामुळे साथीच्या रोगांची लागणं होत आहे.या भागातील लोकांनी या बाबत तहसीदरांना निवेदन देऊन, आमरण उपोषणाचा इशारा देऊनही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही.
अशीच कांही अवस्था गावातील वस्तीच्या रस्त्यांची असून या भागातील लहान मुलांना अतिसार,हिवताप,डेंग्यू सदृश्य रोगांची लागणं झाली असुन सोलापूर बार्शी,धाराशिव येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत,यंदा पाऊस जास्त असल्याने,सततच्या पावसाने थोरा मोठ्यांनाही वस्तीत साठणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे डेंग्यूची लागणं होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे प्रशासनानी वेळीच दखल घेऊन उपाय योजना करावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
चौकट….गेल्या वर्षी जुलै महिन्यात जिल्हा अधीकारी कर्यालयात झालेल्या पर्यटन विकास निधी आराखडा बैठकीत खामगाव पंढरपूर रस्त्यांच्या नालीच्या कामाबाबत ग्रामपंचायत,कंत्राटी मेगा कंपनीत नालीच्या खोलीवरुन मतभेद असुन गावतील गटारीपेक्षा रस्त्याच्या नाल्यांची उंची जास्त असल्याने गावच्या गटारीचे पाणी वाहून जावे असे काम झाले पाहिजे म्हणुन मेगा कंपनीचे नाल्याचे काम थांबवण्यात आल्या बाबत झालेल्या चर्चे नंतर जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांनी कंत्राटी मेगा कंपनीला ग्रामपंचायतच्या म्हणण्यानुसार काम करण्याचे आदेश देऊनही कंपनीने नाल्याचे काम केले नाही.
कोट…. खामगाव पंढरपूर रस्ता उंच झाल्याने पावसाच्या वाहून येणाऱ्या पाण्याचे नियोजन मेगा कंपनीने केले नाही,आमच्या घरात पावसाचे पाणी शिरत आहे. या बाबत तहसीलदार यांना निवेदन देऊनही कांही कारवाई झाली नाही. निवेदनात प्रमाणे आम्ही लवकरच तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहोत.
मल्हारी कसबे.
सिद्धार्थ नगर येरमाळा.
कोट….येरमाळा येथील मेगा कंपनीच्या नल्यांच्या कामामुळे लोकवस्तीत,लोकांच्या घरात पाणी शिरत असेल तर त्याची व्यवस्था करण्याचे मेगा कंपनीला तर साथीच्या रोगांची लागणं होत असेल ती होऊ नये यासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांना बोलून उपाय योजना करण्यास सांगतो.
विजय अवधाने.
तहसीदार कळंब.