डॉ. स्वप्नील मंत्री यांच्या रेल्वेच्या मागण्यासंबंधी निवेदनाची दखल
रेल्वे मंत्र्यांना मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठवले पत्र
परतूर: समस्त परतूरकर यांच्या वतीने डॉ. स्वप्नील बी. मंत्री ह्यांनी रेल्वेच्या विविध मागण्या संबंधी दिलेल्या निवेदनाची खा. डॉ अजित गोपछडे यांच्याकडुन दखल, रेल्वे मंत्र्यांना मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठवले पत्र..
भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रदेश समन्वयक तथा परतूर सर्वांगिण विकास समिती अध्यक्ष डॉ. स्वप्नील बी. मंत्री ह्यांनी राज्यसभा खासदार डॉ अजीत गोपछडे यांना परतूर रेल्वे स्थानकावरील विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी पत्र पाठवले होते. त्यात प्रामुख्याने परतुर येथे सचखंड, नरसापुर, ओखा- रामेश्वर, अजमेर, या सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यात यावा. अजंता, काकीनाडा, विजयवाड़ा एक्सप्रेस व अन्य रात्रीच्या गाड्यांचा थांबा पूर्ववत करणे. तसेच छत्रपती संभाजीनगर येथुन पूर्णा मार्गे अकोला, नागपूर साठी नविन रेल्वे सुरू करणे, छत्रपती संभाजीनगर – गुंटूर एक्स्प्रेस गाडीला सेकंड एसी डब्बा जोडणे आदि मागण्यांचा समावेश आहे.
ह्या निवेदनाची दखल घेत खा. डॉ अजित गोपछडे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवणार असे सांगितले.
निवेदनावर डॉ. स्वप्नील मंत्री, डॉ सुधीर आंबेकर, अजित पोरवाल, डॉ सत्यानंद कराड, आनंद कोटेचा, सखाराम कुलकर्णी, डॉ सुरुशे, अनिल अग्रवाल, एस. एस. पाठक, अमोल अग्रवाल, राजेश खरात, अभिजीत जोशी, गणेश अग्रवाल, डॉ. हरिप्रसाद ढेरे, सौरभ बगडिया, निहित सकलेचा, मनिष अग्रवाल, नरेश कांबळे, नरेश सोनवणे, प्रशांत डोम, सुमित मोर, डॉ. महेंद्र पाटील, डॉ. दीपक दिरांगे, सावता काळे, प्रणय मोर, कुणाल बंसीले, गौतम कोटेचा, वैभव काकडे, अर्जुन पाडेवार, डॉ शितलकुमार लाहोटी, नारायण मुंदडा, अश्विन दायमा, सत्यम झंवर, राधेश्याम तापडीया, महेश लाहोटी व समितीच्या सर्व सदस्यांच्या सह्या आहेत.



















