[] अंनतवारच्या सातव्या दिवशीच्या उपोषणाने ओबीसी समाज उतरला रस्त्यावर []
◆ राष्ट्रीय महामार्गावर बरडशेवाळा येथे रास्ता रोको ◆
हदगाव तालुका प्रतिनिधी :-
हदगाव तालुक्यातील कवाना येथील नंदी महाराज मंदिर परीसरात दत्तात्रय अनंतवार हे मराठा समाजाला दिल्या गेलेल्या ओबीसी प्रमाणपत्र सरसकट रद्द करण्यात यावेत यासाठी रविवार २१ जुलै पासून अमरण उपोषणास बसले असून त्यांच्या उपोषणास हदगांव -हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी समाज बांधवाकडुन दिवसेंदिवस उपोषणाला वाढता पाठींबा मिळत आहे. शनिवार २७ जुलै रोजी उपोषणाचा सातवा दिवस असुन त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे. स्थानिक प्रशासन वगळता लोकप्रतीनीधीसह शासनाने या गंभीर विषयांकडे पाठ फिरवली असल्याने ओबीसी समाज बांधवानी रोष व्यक्त करीत समाजाने एकवटत रस्त्यावर उतरण्याचा इशारा प्रशासनास देत शनिवार सत्तावीस जुलै रोजी नागपूर तुळजापूर राज्य महामार्गावर बरडशेवाळा बायपास वर केलेल्या रास्ता रोको ला हदगांव हिमायतनगर तालुक्यातील ओबीसी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. एक तास रास्ता रोको दरम्यान तालुक्यातील समाज बांधवानी आपल्या भावना व्यक्त करीत नंतर कवाना येथे उपोषणास भेट दिल्याने कवाना येथे ओबीसी समाज बांधवाची गर्दी होती.उपोषणासह रास्ता रोको दरम्यान परीस्थीतीवर तहसीलदार विनोद गुडंमवार ,मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे आपल्या प्रशासनास घेऊन लक्ष ठेवून होते.
उपोषण कर्ते दत्तात्रय अंनतवार यांच्या प्रकृती बिघडत चालली असून जोपर्यंत वरिष्ठ शासन पातळीवर निर्णय घेणार नाहीत यावर उपोषण सुरूच राहील यावर ठाम आहेत. शनिवारीच जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित असल्याने ते दखल घेतील की नाही याकडे सर्वाचेच लक्ष लागले आहे.
![[] अंनतवारच्या सातव्या दिवशीच्या उपोषणाने ओबीसी समाज उतरला रस्त्यावर []](https://i0.wp.com/dainiktarunbharat.com/wp-content/uploads/2024/07/WhatsApp-Image-2024-07-27-at-17.03.21.jpeg?resize=750%2C375&ssl=1)


















