[] स्व: खर्चातुन वृक्षलावगड []
हदगाव तालुका प्रतिनिधी :-
हदगाव तालुक्यातील भानेगाव तांडा येथिल ग्राम पंचायत सदस्य तथा समाज कामात सदैव अग्रेसर राहणारे गोर सीकवाडी या सामाजिक चळवळीचे हदगाव तालुका संयोजक अजयकुमार चव्हाण यांच्या संकल्पनेतून काही महिन्यांपासून हदगाव तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या वृक्षलाडवड या चळवळी ला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तरुण वर्गात झाडांचे महत्त्व व निसर्गाविषयी जनजागृती करून प्रत्यक वाढदिवसाला किमान दोन तरी वृक्षलावगड करण्यात यावी ही संकल्पना रुजवण्यात येत आहे आणि त्याचे फलित म्हणून आता पर्यंत ५०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड गावोगावी कण्यात आले आहे.
आज हदगाव भानेगाव तांडा रोड वर स्वयं खर्चातून ७०० वृक्षलवगड करण्यात आले असून या आठवड्यात किमान २००० वॄक्षलावगड करण्यात येणार आहे असे अजय चव्हाण यांनी सांगितले. वॄक्षलावगडीचे काम पाहण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन प्रशासनाकडून जमेल ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.